ETV Bharat / state

सांगा मुख्यमंत्री, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा; खासदार अमोल कोल्हेंचा सवाल - जयंत पाटील सातारा

राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा बुधवारी साताऱ्यातील दहिवडी येथे पोहोचली. त्यात जयंत पाटील, अमोल कोल्हे आणि अमोल मिटकरी यांची प्रमुख उपस्थिती होती. अमोल कोल्हे यांनी सरकारला धारेवर धरले.

खासदार अमोल कोल्हे
author img

By

Published : Aug 28, 2019, 9:23 PM IST

सातारा - स्वराज्य स्थापन करण्यापूर्वी जागोजागी वतनदार होते. पण आता भाजप-शिवसेनेची वतनदारी संपुष्टात आणून स्वराज्य स्थापन करायचे असल्याचे खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले. दहिवडी येथील शिवस्वराज्य यात्रेमध्ये ते बोलत होते. राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने काढण्यात आलेल्या शिवस्वराज्य यात्रेचे दहिवडी शहरात आगमन झाले. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, आमदार शशिकांत शिंदे, आमदार दिपक चव्हाण, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, माजी आमदार प्रभाकर घार्गे, जिल्हाध्यक्ष सुनिल माने, जि.प अध्यक्ष संजिवराजे नाईक-निंबाळ, तेजस शिंदे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

कुठे नेऊन ठेवलायं महाराष्ट्र माझा

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, खटाव-माणचा आमदार कसा असावा हे आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी २०१९ ची निवडणूक आहे. राज्यात काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीची अवस्था चांगली असताना पवार साहेबांनी आयुष्यभर डोक्यावरचा लाल दिवा हटू दिला नाही. ते लोक आज पक्ष सोडत आहेत. राजकीय व्याभिचार राज्यात सुरु आहेत. आमच्याकडे शरद पवार नावाचे विद्यापीठ आहे. त्यामुळे कोण पक्ष सोडून गेला याची आम्हाला चिंता नाही. राज्यातील नोकऱ्या धोक्यात आहे. एक कोटी लोकं बेरोजगार झाले. उद्योगधंदे आर्थिक संकटात आले आहेत. पश्चिम महाराष्ट्राला निधी मिळू नये असे कुणाला वाटत असेल तर ते राज्याच्या प्रमुखाला वाटते, असे टिकास्त्र मुख्यमंत्र्यांवर त्यांनी सोडले.

डॉ. अमोल कोल्हे म्हणाले की, स्वराज्य स्थापन करण्यापूर्वी जागोजागी वतनदार होते. पण छत्रपतींनी रयतेचे राज्य निर्माण करताना वतनदारी संपुष्टात आणून स्वराज्य स्थापन केले. ६ ऑगस्टला शिवस्वराज्य यात्रेस सुरुवात केली. महाजनादेश यात्रेला महाराष्ट्रात काळे झेंडे दाखवले जात आहेत. महाराजांचे नाव घेऊन मुख्यमंत्री महाजनादेश यात्रा काढतात. आत्महत्या, बेरोजगारी, माता भगिनींवर अत्याचार, कर्जमाफी नाही, पिक विमा, कायदा व्यवस्थेचे धिंडवडे निघत आहेत. आता सांगा मुख्यमंत्री, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? असा सवाल कोल्हेंनी मुख्यमंत्र्यांना केला. विधानसभेची निवडणूक राज्याची आहे. आज सुपात असणारी उद्या जात्यात असणार आहेत. देशात सत्तर वर्षात नव्हती येवढी अत्यंत वाईट स्थिती आज आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अनेक मॅसेज पाठवतील. त्यांना आपल्या प्रश्नाचे काय झाले हे विचारा, असे आवाहनही त्यांनी केले.

अमोल मिटकरी म्हणाले की, राज्यात अनेक यात्रा निघत आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बेरोजगारीवर व महाराष्ट्राचा कायापालट झाला असा भास या यात्रेतून दाखवत आहेत. आजवरच्या सरकारांमधील हे सरकार पापी असल्याचा आरोप त्यांनी सरकारवर केला. मुख्यमंत्र्यांना खरा विश्वास असेल तर ईव्हीएम हटवून बँलेट पेपरवर निवडणुका घेऊन दाखवाव्या, असे आवाहनही त्यांनी केले.

Intro:सातारा स्वराज्य स्थापन करण्यापूर्वी जागोजागी वतनदार होते पण आता भाजप शिवसेनेची वतनदारी संपूष्टात आणून स्वराज्य स्थापन करायचे आहे असे प्रतिपादन खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी दहिवडी येते शिवस्वराज्य यात्रे मध्ये केले

राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने काढण्यात आलेल्या शिव स्वराज्य यात्रेचे आगमन दहिवडी शहरात झाले यावेळी दहिवडी बाजार पटांगणावर जाहिर सभा झाली यासभेस राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,खासदार.अमोल कोल्हे,आमदार शशिकांत शिंदे,आमदार दिपक चव्हाण, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर ,माजी आ.प्रभाकर घार्गे ,जिल्हाध्यक्ष सुनिल माने,जि.प अध्यक्ष संजिवराजे नाईक निंबाळ,राष्ट्रवादी युवक जिल्हाअध्यक्ष तेजस शिंदे,माजी सभापती संदीप मांडवे,जि.प समाजकल्याण सभापती शिवाजीराव सर्वगोड ,सुभाषराव शिंदे,प्रा. कविता म्हेत्रे,सुरेंद्र गुदगे,डॉ संदीप पोळ,मनोज पोळ,युवराज सुर्यवंशी,राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष बाळासाहेब सावंत,जिप सदस्या सोनाली पोळ,डॉ भारती पोळ, राष्ट्रवादी महिला अध्यक्ष छाया जाधव यावेळी उपस्थित होते.Body:चाकणकर -शिवस्वराज्य यात्रा नवीन स्वराज्य निर्माण करण्यासाठी सांगली कोल्हापूर येथील पूरपरिस्थितीत तेथील पालकमंत्री गायब होते.ते फक्त २६ जानेवारी व १५ आँगस्टला झेंडा फडकवण्याच्याच कामाचे आहेत का ? १४ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या मध्ये महाराष्ट्र हा तिसर्या क्रमांकावर आहेत असे मुख्यमंत्री कसे सांगू शकतात असा प्रश्न केला, पोलीओ डोस आम्ही पाजले नसते तर वेडेवाकडे जन्माला आले असता.पवार साहेबांच्या विचारांना साथ द्या जे साहेबांना सोडून गेले त्यांना श्रध्दांजली वाहते.साहेबांमुळे तुमची समाजात ओळख आहे.पक्ष सोडताना साहेबांवर कोणी बोलला तर याद राखा...संकल्पनेचा झेंडा माय माऊलीच्या रक्षणासाठी आहे.सध्याच्या सरकारने अनेक घोटाळे केले आहेत.बळीराजाचे सरकार आणण्यासाठी राष्ट्रवादीची सत्ता आणून राष्ट्रवादीचा झेंडा विधानसभेवर फडकवूया.

अमोल मेटकरी - राज्यात अनेक यात्रा निघाल्यात मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा ही निघाली आहे.शेतकऱ्यांचे प्रश्नावर बेरोजगारीवर,महाराष्ट्राचा कायापालट झाल्यासारखे यात्रा काढतात.सर्व घटक भयभीत आहेत.आजवरच्या सरकारमधील हे पाच वर्षातील सरकार पापी आहे.मुख्यमंत्र्यांना खरा विश्वास असेल तर इव्हीएम हटवून बँलेट पेपरवर निवडणूका घेऊन दाखवावी.काल व आजचा सूर्य त्यांचा होता व आहे.पण उद्याचा उगवणारा सुर्य राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे.

शशिकांत शिंदे - लोकसभेला या माणखटावची जनतेने बरोबरीत सोडवली.उद्याचा इतिहास राष्ट्रवादीचा आहे.माण खटावचा उद्याचा आमदार राष्ट्रवादीचा आहे.पाऊस पडत असतानाही जनता हलली नाही या विश्वासावर उद्याचा आमदार राष्ट्रवादीचा असणार हा विश्वास देतो सातारा जिल्हा राष्ट्रवादीचा आहे व राहिल.
राज्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, खटाव माणचा आमदार कसा असावा हे आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी २०१९ ची निवडणूक आहे. राज्यात काँग्रेस पेक्षा राष्ट्रवादीची आवस्था चांगली असताना पवार साहेबांनी आयुष्यभर डोक्यावरचा लाल दिवा हटू दिला नाही ते लोक पक्ष सोडत आहेत. राजकीय व्याभिचार राज्यात सुरु आहे.शिवस्वराज्य यात्रेला सध्याच्या शासनाच्या विरोधात जनतेत नाराजी असल्याने प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.आमच्याकडे शरद पवार नांवाचे विद्यापीठ आहे त्यामुळे कोण पक्ष सोडून गेला याची आम्हाला चिंता नाही.राज्यातील नोकर्या धोक्यात एक कोटी लोकं बेरोजगार झाले.उद्योगधंदे आर्थीक संकटात आले आहेत.पश्चिम महाराष्ट्राला निधी मिळू नये असे कुणाला वाटत असेल तर ते राज्याच्या प्रमुखाला असे टिकास्त्र मुख्यमंत्र्यांवर सोडले.कायम दुष्काळी भागाला पाण्यात बघण्याचे पाप मुख्यमंत्र्यांचे आहे गोडबोलणारांचे राज्य आहे.दोन दिवसात सभेचे नियोजन करुन प्रतिसाद मिळतो हि किमया फक्त पवार साहेबांच्या प्रेमापोटीच होऊ शकते

यावेळी डॉ अमोल कोल्हे म्हणाले, स्वराज्य स्थापन करण्यापूर्वी जागोजागी वतनदार होते पण छत्रपतीनी रयतेचे राज्य निर्माण करताना वतनदारी संपूष्टात आणून स्वराज्य स्थापन केले.६ आँगस्टला शिवस्वराज्य यात्रेस सुरुवात केली.महाजनादेश यात्रेला महाराष्ट्रात काळे झेंडे दाखवले जातायत. महाराजांचे नांव घेऊन मुख्यमंत्री महाजनादेश यात्रा काढतात ६९ वर्षाच्या माऊलीला नजरकैद करता. माता बहिनीचीही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना वाटावी.माता बहिनीचा आशिर्वाद मिळतो महाजनादेश यात्रेत जनते पेक्षा पोलिसांची गर्दी असते.शाहू फुले आंबेडकराचे नांव घेणाऱ्या राष्ट्रवादीला आता च का छत्रपतीचे नांव घेण्याची काय गरज आहे असे विचारले जात आहे त्यांना माझे सांगणे आहे.आता पर्यत भगवा तरुणांच्या हातात दगड देण्यासाठी व माथी भडकवण्यासाठी घेतला होता तोच भगवा आम्ही घेतलाय विधायक वाट दाखवण्यासाठी घेतलाय. २०१४ ला छत्रपतींचा आशिर्वाद काल पण आजपण यापुढेही महाराष्ट्राचे राजे फक्त फक्त शिवाजी महाराजच. आत्महत्या, बेरोजगारी, माता बघिनींवर आत्याचार,कर्ज माफी नाही पिक विमा कुठाय,कायदा व्यवस्था धिंडवडे निघाल्यात आता सांगा मुख्यमंत्री कुठे नेहून ठेवलाय महाराष्ट्र माझा.हि निवडणूक राज्याची आहे.आज सुफात असणारी उद्या जात्यात असणार आहात.देश सत्तर वर्षात आर्थिक परिस्थिती नव्हती ती आताची देशाची आर्थिक परिस्थिती अत्यंत वाईट आहे.येणाऱ्या विधान सभा निवडणूकीत अनेक मेसेज पाठवतील त्यांना आपल्या प्रश्नाचे काय झाले हे विचारा..असे आवाहन केले. एखादा बुरुज पडला म्हणून किल्ला पडत नसतो.आज ओहोटी असेल तर भविष्यात मोठी सुनामी लाट येईल तेव्हा तुमचे इमले कुठे असतील असा इशारा पक्ष सोडणार्याना दिला.

Plz see videoConclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.