सातारा - शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत, यासाठी कऱ्हाड येथील शिवसैनिकांनी कृष्णा घाटावरील रत्नेश्वर मंदिरात होमहवन व अभिषेक केला. यावेळी माजी नगरसेवक प्रमोद वेर्णेकर, कुलदीप जाधव, महेश कोळी यांच्यासह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.
हेही वाचा... शिवसेना खासदार अरविंद सावंतांचा मंत्रीपदाचा राजीनामा राष्ट्रपतींकडून मंजूर
शिवसैनिकांकडून साताऱ्यातील कृष्णा घाटावरील रत्नेश्वर मंदिरातील शंभू महादेवाच्या पिंडीवर अभिषेक आणि होम-हवन करण्यात आला. यावेळी विद्यावाचस्पती विनायक गरुड यांनी होमहवन आणि अतुल कुलकर्णी, मिलींद कुलकर्णी यांनी पौरोहित्य केले. महाराष्ट्रात शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी अनुकूल परिस्थिती असून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची संधी शिवसेनेकडे आली आहे. शेतकर्यांना न्याय मिळण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत, यासाठी शिवसैनिकांनी हा अभिषेक आणि होमहवन केला.
हेही वाचा... महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष : राष्ट्रपती राजवटीच्या दिशेने वाटचाल, काँग्रेस निर्णायक पाऊल उचलणार?