ETV Bharat / state

उदयनराजेंवर शिवेंद्रराजेंनी डागली तोफ; 'ते' थापांचा पाऊस पाडण्यात माहीर

सातारा पालिकेला सत्ताधाऱ्यांनी भ्रष्टाचाराचे कुरन बनवले असून सत्ताधाऱ्यांवर कोणाचाही अंकुश राहिलेला नाही. आता परवाच निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेसंदर्भात सूचना काढल्याने सत्ताधाऱ्यांनी विकासकामांचा पाऊस दाखवून नागरिकांना भुलवण्याचा उद्योग सुरु केला आहे, अशी टीका ही आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी लगावला आहे.

Shivendra Raje fired a cannon at Udayan Raje on the issue of satara development
उदयनराजेंवर शिवेंद्रराजेंनी डागली तोफ
author img

By

Published : Aug 22, 2021, 9:34 PM IST

सातारा - गेल्या साडेचार वर्षांत सत्ताधाऱ्यांनी पालिकेला फक्त लुटण्याचे काम केले. आता निवडणूक जवळ आल्याने विकासकामांचा पाऊस भासवण्याचा प्रयत्न केला जात आहे. सत्ताधारी थापांचा पाऊस पाडण्यात माहीर असले तरी हा केवळ निवडणुकीचा मोसमी पाऊस आहे. त्यामुळे पालिकेतील 'कचरा' हळूहळू हद्दपार करण्याची वेळ जवळ आली आहे, असा उपरोधिक टोला आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी लगावला आहे.

विकासकामांचा पाऊस दाखवून भुलवण्याचा उद्योग -

सातारा पालिकेच्या आगामी बैठकीत विविध विकास कामांसाठी तरतूद केली असल्याची माहिती खासदार उदयनराजेंनी दिली आहे. त्यावर आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी पत्राद्वारे टिका केली आहे. शिवेंद्रसिंहराजे यांनी पत्रकात म्हटले आहे, "गेल्या साडेचार- पावणेपाच वर्षात सातारा पालिकेत सत्ताधारी आघाडीतील नगरसेवकांमध्ये टेंडर टक्केवारीसाठी लागणारी कळवंड सातारकर उघड्या डोळ्याने पाहत आले आहेत. या कळवंडीवर पडदा टाकण्याचा केविलवाणा प्रयत्न नेत्यांना अनेकदा करावा लागला. नेते भ्रष्टाचार खपवून घेत नाहीत असा नुसता ढोल बडवून अन् डांगोरा पिटून पालिकेतील भ्रष्ट कारभाराचे सत्य लपवण्याचा प्रयत्न अनेकदा झाला. वास्तविक सातारा पालिकेला सत्ताधाऱ्यांनी भ्रष्टाचाराचे कुरन बनवले असून सत्ताधाऱ्यांवर कोणाचाही अंकुश राहिलेला नाही. आता परवाच निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेसंदर्भात सूचना काढल्याने सत्ताधाऱ्यांनी विकासकामांचा पाऊस दाखवून नागरिकांना भुलवण्याचा उद्योग सुरु केला आहे.

साधे आयसोलेशन सेंटर केलं नाही -

निवडणूक आयोगाने सूचना थोडी उशिरा काढली असती तर सातारकरांना हा थापेबाजी पाऊस आज दिसला नसता, हा कथित विकासकांचा पाऊसही लांबला असता. नेत्यांनी पत्रकबाजी करून पाडलेला पाऊस हा निवडणुकीचा मोसम आल्यानेच पडला आहे. अख्ख्या टर्ममध्ये सत्ताधाऱ्यांनी कमिशन आणि टक्केवारीसाठी एकमेकांची गचुंडी धरली, घरकुल योजना, घनकचरा प्रकल्प, घंटागाडी अशा सर्वच कामांमध्ये भ्रष्टाचार झाला. कमिशन तुला मिळतंय की मला अशी अजब स्पर्धाच सत्ताधाऱ्यांनी पालिकेत सुरु केली. हद्दवाढ होऊन आता वर्षभराचा कालावधी लोटला पण, हद्दवाढीतील नवीन भागासाठी एकही काम सत्ताधाऱ्यांनी केले नाही. कोरोना महामारीचा विळखा बसला असताना साधे एक आयसोलेशन सेंटर सुरु केले नाही आणि आता निवडणूक डोळ्यासमोर ठेवून निघाले विकासकामांचा पाऊस पाडायला.

काय आहे पार्श्वभूमी -

नगर पालिकांची वाॅर्डरचना व आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. एकप्रकारे नोव्हेंबरमध्ये मुदत संपणाऱ्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. सातारा पालिकेत भाजपचे राज्यसभा सदस्य उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वाखालील सातारा विकास आघाडीची सत्ता आहे. तर भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखालील नगरविकास आघाडी विरोधी पक्ष म्हणून कार्यरत आहेत.

हेही वाचा -गणेशभक्तांसाठी खूशखबर! दादर ते सावंतवाडी धावणार मोदी एक्सप्रेस, नितेश राणेंची माहिती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.