सातारा : शिवसेनेच्या आमदारांनी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली जे बंड केले, त्या घडामोडींमध्ये पाटणचे आमदार शंभूराज देसाई आघाडीवर होते. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाच्या उपनेतेपदी उत्पादन शुल्क मंत्री तथा पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांची निवड करण्यात आली ( Shambhuraj Desai Selected as Deputy Leader ) आहे. सातारा-शिवसेना शिंदे गटाच्या उपनेतेपदी उत्पादन शुल्क मंत्री तथा पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल आमदार देसाईंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले ( Shambhuraj Desai has Thanked to CM Eknath Shinde ) आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना जनसेवेसाठी कटिबद्ध : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे ज्वलंत विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण, या आधारावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्ष जनहित आणि जनसेवेसाठी कटिबद्ध राहील, असा विश्वास आमदार शंभूराज देसाईंनी व्यक्त केला आहे.
बंडखोरीच्या घडामोडीत शंभूराजे होते आघाडीवर : महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी शिवसेनेच्या आमदारांनी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली जे बंड केले, त्या घडामोडींमध्ये पाटणचे आमदार शंभूराज देसाई आघाडीवर होते. सुरतला ते पहिल्यांदा पोहोचले होते. तसेच नाराज आमदारांशी चर्चा करण्यातही शंभूराजेंचा पुढाकार होता. शंभूराजे सध्या मुख्यमंत्र्यांच्या सर्वात निकटचे मानले जातात.