सातारा - माण खटावच्या राजकारण मध्ये शेखर गोरेंनी शिवसेनेतून अर्ज दाखल केला आहे. तर त्यांच्या मोठ्या बंधूनी भाजपमधून अर्ज दाखल केला आहे. जयकुमार गोरे यांच्या नामांकनावेळी सर्व शिवसेना पदाधिकारिऱ्यांनी पाठ फिरवली होती तर आज शेखर गोरे यांच्या समवेत जाहीर सभेत सर्व शिवसैनिक उपस्थित होते.
आज शेखर गोरे यांनी माणचे माजी आमदार स्वताला जलनायक म्हणून माण खटावमध्ये पाणी आणलंय म्हणतात, तर माण खटावमध्ये ८३ पाण्याचे टँकर कसे सुरु होते? ९७ गावात पाणी पोहचवले म्हणतात तर, ते गेले कुठे? असा प्रश्न उपस्थित करत निवडणूका आल्याकी दुष्काळी भागात पाणी आणल्याचे नाटक करायचे हे आता जनतेला समजले आहे. या निवडणूकीत जनतेने मला आशिर्वाद देवून विधानसभेत पाठवले, तर शपथविधी नंतर आठ दिवसात माण खटावचा पाणी प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी विधानभवनासमोर आंदोलन करणार असल्याचे आश्वासन शिवसेनेचे अधिकृत उमेदवार शेखर गोरे यांनी दिली. ते विधानसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी दहिवडी (ता. माण )येथील इंगळे मैदानावरील आयोजित जाहीर सभेत बोलत होते.
यावेळी बोलताना शेखर गोरे म्हणाले, आजवर ज्या पक्षात गेलो तेथे अन्यायच वाट्याला आला. ज्यापक्षात ८० समाजकारण आणि २० टक्के राजकारण करणाऱ्या पक्षात मी प्रवेश केला. प्रसारमाध्यमांना मुलाखत देताना माजी आमदार म्हणतात मी माझ्या मतदारसंघात दहा वषाँत विकासकामे करु शकलो नाही म्हणून भाजपात जातोय. दहा वषाँत माण खटाव मध्ये उद्योग धंदे आले नाहीत. त्यामुळे रोजगार नाही, शैक्षणिक व वैद्यकीय सुविधा उपलब्ध केल्या नाहीत. आजवर पाणीप्रश्नांवरच येथील निवडणूका लढल्या गेल्या. मात्र, हा प्रश्न कायमस्वरुपी सोडवण्यासाठी प्रयत्न झाला नाही, तरी येथील जनतेने मला आशिर्वाद द्यावा तुमचे उपकार कधीच विसरणार नसल्याचे गोरे म्हणाले. दरम्यान सभा स्थळापासून विराट शक्तीप्रदशन करत रॅलीने शेखर गोरेंनी जाऊन तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला.