ETV Bharat / state

शरद पवारांचा दुष्काळी भागाचा दौरा, साताऱ्यातील गावांना दिली भेट

शरद पवारांनी सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भागाचा दौरा केला.

दुष्काळी दौऱ्यात संबोधताना शरद पवार
author img

By

Published : May 26, 2019, 2:35 PM IST

सातारा - साताऱ्यात आज दुष्काळाची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. मात्र, आपण हरायचे नाही. राज्य सरकारकडून दुष्काळावर मात करण्यासाठी मदत घेऊ आणि आपण सर्व मिळून पुन्हा दुष्काळ येऊ नये यासाठी प्रयत्न करू, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांना केले आहे.

दुष्काळी दौऱ्यात संबोधताना शरद पवार

सातारा जिल्ह्यात कोरेगाव तालुक्यातील चिलेवाडी, नागेवाडी या गावात जाऊन तेथील दुष्काळी भागाची परिस्थिती शरद पवार यांनी जाणून घेतली. यावर्षी पाऊस उशिरा येईल, असा हवामान खात्याचा अंदाज असून नंतर पाऊस चांगला पडेल, असे म्हटले जात आहे. परंतु, त्यासाठी आपण तयार राहायला हवे. पाण्याचे योग्य नियोजन करावे लागेल. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचविण्याचा प्रयत्न आपण करायला हवा. पाणी फाउंडेशन सध्या राज्यभरात चांगले काम करत आहे, त्यांना गावकरी मदत करतात हे पाहून समाधान वाटते, असे शरद पवार म्हणाले.

आज अनेक गावांमध्ये टँकरची मागणी आहे. रेशनकार्डवर धान्य मिळत नाही, अशी तक्रार शेतकरी करत आहेत. चारा छावण्या गावातच चारा डेपोची व्यवस्था व्हावी, अशा विविध मागण्या जनता करत आहे. आम्ही या सर्व गोष्टी सरकारपर्यंत पोहोचवू. या कठीण प्रसंगी आम्ही तुमच्या सोबत आहोत, असा ठाम विश्वास पवार यांनी दुष्काळी भागातील जनतेला दिला. यावेळी सातारा लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार उदयनराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे आदी उपस्थित होते.

Intro:सातारा आजची सबंध दुष्काळी परिस्थिती आहे. काळ कठीण आहे. मात्र आपण हरायचे नाही. दुष्काळा संबंधित राज्य सरकारकडून मदत घेऊ आणि आपण सर्व मिळून पुन्हा दुष्काळ येऊ नये म्हणून प्रयत्न करू, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दुष्काळग्रस्त भागातील लोकांमध्ये निर्माण केला.

Body:सातारा जिल्ह्यात कोरेगाव तालुक्यातील चिलेवाडी, नागेवाडी या गावात जाऊन तेथील दुष्काळी भागाची परिस्थिती जाणून घेतली. संकट आलंय म्हणून नाउमेद व्हायचे नसते. संकटांमुळे खचून जायचं नसतं. असा आत्मविश्वास शरद पवार यांनी दुष्काळी भागातील लोकांच्या मनात जागृत केला. यावर्षी पाऊस उशिरा येईल. असा हवामान खात्याचा अंदाज आहे. नंतर पाऊस चांगला पडेल असे म्हटले जात आहे. पाऊस चांगला पडेल परंतु त्यासाठी आपण तयार राहायला हवं पाण्याचे योग्य नियोजन करावे लागेल.पाण्याचा थेंब न थेंब वाचविण्याचा प्रयत्न आपण करायला हवा पाणी फाउंडेशन सध्या राज्यभरात चांगले काम करत आहे,त्यांना गावकरी मदत करतात हे पाहून समाधान वाटत आहे. हे सुरू ठेवले पाहिजे किंबहुना आपण वाढवले पाहिजे असे शरद पवार म्हणाले.

आज अनेक गावांमध्ये टँकरची मागणी आहे. रेशन कार्ड वर धान्य मिळत नाही. अशी तक्रार शेतकरी करत आहेत.चारा छावण्या गावातच चारा डेपोची व्यवस्था व्हावी अशा विविध मागण्या जनता करत आहे. आम्ही या सर्व गोष्टी सरकार पर्यंत पोहोचवु. या कठीण प्रसंगी आम्ही तुमच्या सोबत आहोत.असा ठाम विश्वास शरद पवार यांनी दुष्काळी भागातील जनतेला दिला यावेळी सातारा लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार उदयनराजे भोसले , आमदार शशिकांत शिंदे आदी उपस्थित होते.

व्हिडिओ सेंड whatsapp

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.