ETV Bharat / state

हम साथ साथ है, शरद पवारांच्या मध्यस्थीने दोन्ही राजेंच 'मनोमिलन'

खासदार उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्यात मनोमिलन झाले आहे.शरद पवारांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या बैठकीत दोघांमधील वादावर पडदा टाकण्यात आला आहे

उदयनराजे आणि शिवेंद्रराजे भोसले यांचे मनोमिलन
author img

By

Published : Mar 9, 2019, 11:08 PM IST

सातारा - राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मध्यस्थीनंतर अखेर खासदार उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्यात मनोमिलन झाले आहे. सातारा लोकसभेचा तिढा सुटला असून उदयनराजे यांच्याच नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. आगामी निवडणुकीत उदयनराजेंचे काम करण्याची ग्वाही साताऱ्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.

शरद पवारांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या बैठकीत दोघांमधील वादावर पडदा टाकण्यात आला आहे. शरद पवारांच्या मध्यस्थीनंतर दोन्हीही राजेंचे मनोमिलन झाले. उदयनराजे यांच्या कारभारामुळे सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांच्या विरोधात प्रचंड असंतोष आहे. दोन्ही राजेंच्या गटामध्ये मधल्या काळात जोरदार राजकीय संघर्ष झाला होता. त्यातून राष्ट्रवादीच्या लोकसभा निवडणुकीत उदयनराजे यांचे काम न करण्याचा निर्णय शिवेंद्रराजे यांनी घेतला होता. पक्षश्रेष्ठींना तसे कळवण्यात आले होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा साताऱयाचा उमेदवार ठरत नव्हता.

निवडणुकीसाठीच्या अनेक बैठका होऊन ही राष्ट्रवादीने उदयनराजेंना वेटिंगवर ठेवल्याने ते अस्वस्थ होते. मुख्यमंत्र्यांची स्तुती करत त्यांची भाजपशी जवळीक वाढली होती. त्यामुळे राष्ट्रवादी सावध झाली होती. पश्चिम महाराष्ट्रातील हक्काची जागा हातातून जाऊ नये म्हणून अखेर शरद पवारांनी साताऱ्यातील वादावर लक्ष घालत दोन्ही राजेंचे मनोमिलन घडवून आणले.

आज मुंबईत सातारच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलविण्यात आली होती. दोन्ही राजे यावेळी उपस्थित होते. या बैठकीत विविध विषयावर चर्चा झाली. चर्चेअंती पक्षातील वादावर पडदा टाकण्यात आला आहे. सर्व पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीत एकदिलाने काम करण्याचे ठरवल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले. यावेळीरामराजे नाईक निंबाळकर, शशिकांत शिंदे तसेच जिल्ह्यातील प्रमुख नेते उपस्थित होते.

Intro:सातारा लोकसभेच्या जागेचा तिढा अखेर सुटला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. गेल्या काही वर्षापासून एकमेकांच्या समोर उभे ठाकलेले साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यात अखेर दिलजमाई झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आज झालेल्या बैठकीत दोघांमधील वादावर पडदा टाकण्यात आला, आगामी निवडणुकीत उदयनराजे यांचे काम करण्याची ग्वाही साताऱ्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी दिले आहे.

Body:राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबईत तातडीची बैठक आयोजित केली होती. शरद पवार यांच्या मध्यस्थीनंतर दोन्हीही राजेंचे मनोमिलन झाले. उदयनराजे यांच्या एकत्रित कारभारामुळे सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांच्या विरोधात प्रचंड असंतोष आहे. दोन्ही राजे गटा मध्ये मधल्या काळात जोरदार राजकीय संघर्ष झाला होता. त्यातून राष्ट्रवादीच्या लोकसभा निवडणुकीत उदयनराजे यांचं काम न करण्याचा निर्णय शिवेंद्रराजे यांनी घेतला होता. पक्षश्रेष्ठी ना तसं कळवण्यात आलं होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा सातारचा उमेदवार ठरत नव्हता निवडणुकीसाठीच्या अनेक बैठका होऊन ही राष्ट्रवादीने उदयनराजेंना वेटिंगवर ठेवल्याने ते अस्वस्थ होते. मुख्यमंत्र्यांची स्तुती करत त्यांची भाजपशी जवळीक वाढली होती त्यामुळे राष्ट्रवादी सावध झाली होती. पश्चिम महाराष्ट्रातील हक्काची जागा हातातून जाऊ नये म्हणून अखेर शरद पवार यांनी साताऱ्यातील वाद लक्ष घालवण्याचं ठरवलं त्यानुसार आज मुंबईत सातारच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलविण्यात आली होती. दोन्ही राजे यावेळी उपस्थित होते. या बैठकीत विविध विषयावर चर्चा झाली चर्चेअंती पक्षातील वादावर पडदा टाकण्यात आला आहे. सर्व पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीत एक दिलाने काम करायचं ठरवलं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबत माहिती दिली.
यावेळी रामराजे नाईक निंबाळकर, शशिकांत शिंदे, तसेच जिल्ह्यातील प्रमुख उपस्थित होते.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.