अँटिग्वा (वेस्ट इंडिज) WI Beat ENG by 8 Wickets : वेस्ट इंडिज आणि इंग्लंड क्रिकेट संघ यांच्यातील वनडे मालिका सुरु झाली आहे. या तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना वेस्ट इंडिजनं 8 विकेटनं सहज जिंकला आहे. सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडचा संघ अवघ्या 209 धावांत सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजला डकवर्थ लुईस स्टर्न नियमाचा वापर करुन 35 षटकांत 157 धावांचं लक्ष्य मिळालं. परिणामी यजमानांनी 9 षटकं शिल्लक असताना सामना जिंकला. यासह वेस्ट इंडिजनं मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
West Indies cruise to victory in the opening ODI against England in Antigua 👏
— ICC (@ICC) November 1, 2024
#WIvENG scorecard 📝 https://t.co/RqAyu6uxgH pic.twitter.com/GqVRkvF4xz
एविन लुईसची वादळी खेळी : श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेतील शेवटच्या सामन्यात स्फोटक शतक झळकावणाऱ्या एविन लुईसनं या सामन्यातही वादळी खेळी केली. सुरुवातीला तो सावध खेळत होता पण नंतर त्यानं आक्रमक खेळायला सुरुवात केली. लुईसचं अर्धशतक 46 चेंडूत पूर्ण झालं. पावसाचा व्यत्यय आला तेव्हा वेस्ट इंडिजची धावसंख्या 81 धावा होती. लुईस 48 चेंडूत 51 धावा करुन खेळत होता. पावसानंतर खेळ पुन्हा सुरु झाला तेव्हा लुईसनं आक्रमक फलंदाजी केली. पुढच्या 21 चेंडूत 43 धावा करत त्यानं वेस्ट इंडिजचा विजय जवळपास निश्चित केला. त्याचं शतक मात्र हुकलं. लुईसनं 69 चेंडूंत 5 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीनं 94 धावा केल्या.
Victory🏆for the #MenInMaroon in the 1️⃣st CG United ODI, finishing off a rain soaked night in style🏏🌴 #TheRivalry | #WIvENG pic.twitter.com/wZenarDCJ9
— Windies Cricket (@windiescricket) November 1, 2024
पहिल्या विकेटसाठी मोठी भागिदारी : वेस्ट इंडिजकडून लुईसशिवाय ब्रँडन किंगनं 30 धावा केल्या. किंग आणि लुईस यांच्यात पहिल्या विकेटसाठी 118 धावांची भागीदारी झाली. इंग्लंडकडून आदिल रशीद आणि कर्णधार लियाम लिव्हिंगस्टोन यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
The boys take the win in the 1st match of the Rivalry in Antigua!🇦🇬
— Windies Cricket (@windiescricket) November 1, 2024
Get ready for more action in the 2nd CG United ODI, Nov 2.🙌🏾#TheRivalry | #WIvENG pic.twitter.com/5zZ3PzxH5G
इंग्लंडची फलंदाजी अपयशी : इंग्लंडच्या जवळपास सर्वच फलंदाजांनी चांगली सुरुवात केली. यानंतरही कोणीही मोठी खेळी करु शकली नाही. टॉप-6 मध्ये सर्व फलंदाजांनी 15 धावांचा टप्पा ओलांडला पण कोणीही पन्नाशी गाठू शकलं नाही. कर्णधार लियाम लिव्हिंगस्टोननं सर्वाधिक 49 चेंडूंत 3 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीनं 48 धावा केल्या. गुडाकेश मोटीनं चार फलंदाजांना बाद केलं. अल्झारी जोसेफ, जेडेन सील्स आणि मॅथ्यू फोर्डनं प्रत्येकी 2 बळी घेतले.
Defeat in the series opener.
— England Cricket (@englandcricket) November 1, 2024
We will look to bounce back in the second match on Saturday.
🌴 #WIvENG 🏴 | #EnglandCricket pic.twitter.com/GLRVjWguW2
हेही वाचा :