ETV Bharat / state

Shambhuraje Desai Visited Pusesavali: दंगलीनंतर दहा दिवसांनी साताऱ्याच्या पालकमंत्र्यांची पुसेसावळीला भेट, पीडिताच्या कुटुंबानं 'ही' केली मागणी

Minister Desai Visited Pusesavali: साताऱ्यातील पुसेसावळी गावात 10 सप्टेंबरच्या रात्री उसळलेल्या दंगलीत एकाचा मृत्यू झाला होता. पुसेसावळी गावातील जनजीवन पूर्वपदावर आल्यानंतर पालकमंत्री शंभूराज देसाईंनी तब्बल दहा दिवसांनी घटनास्थळी भेट दिली.

Minister Desai Visited Pusesavali
पुसेसावळीला दिली भेट
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 20, 2023, 9:32 PM IST

पुसेसावळीतील परिस्थितीविषयी बोलताना पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा Minister Desai Visited Pusesavali: सोशल मीडियावरील वादग्रस्त पोस्टवरून सातार्‍यातील पुसेसावळी गावात उसळलेल्या दंगलीनंतर येथे खासदार उदयनराजे भोसले, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री हुसेन दलवाई यांनी गावात जाऊन सामाजिक सलोख्याचे आवाहन केले. पुसेसावळीतील जनजीवन पूर्वपदावर आल्यानंतर पालकमंत्री शंभूराज देसाई तब्बल दहा दिवसांनी पुसेसावळीला भेट दिली.

मृताच्या कुटुंबीयांचे केले सांत्वन: पुसेसावळीत जाऊन पालकमंत्र्यांनी मृताच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. त्यांनतर त्यांनी शांतता कमिटीची बैठक घेतली. घटनेतील दोषींवर कडक कारवाई केली जाईल, अशी ग्वाही दिली. तसेच निर्दोष असणार्‍या कोणालाही त्रास होणार नाही. ग्रामस्थांनी प्रशासनाला सहकार्य करावे. गावातील व्यवहार पूर्वीप्रमाणे सुरू ठेवावेत, असे आवाहन पालकमंत्री शंभूराज देसाईंनी केले. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पोलीस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त पोलीस अधीक्षक बापू बांगर यांच्यासह सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.

निर्दोष व्यक्तींना त्रास होणार नाही: पुसेसावळीतील घटना दुर्दैवी आहे. ग्रामस्थांनी शांतता राखून कायदा, सुव्यवस्थेचे पालन करावे, असे आवाहन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले. प्रशासनाने गावात सलोखा प्रस्थापित केला आहे. पोलीस दोषींवर कारवाई करत आहेत. याप्रकरणी निर्दोष व्यक्तीवर कारवाई होणार नाही. त्यांना त्रास होणार नाही, याची प्रशासन खबरदारी घेईल, असा विश्वास पालकमंत्र्यांनी ग्रामस्थांना दिला.

इच्छा मरणाची परवानगी द्या: आमचा एकुलता एक मुलगा दंगलीत मारला गेला. आता आम्ही जगून तरी काय करू, असा आर्त सवाल दंगलीतील मृत नूर हसन शिकलगार या तरुणाच्या कुटुंबीयांनी पालकमंत्र्यांना केला. आम्हाला न्याय द्या, अथवा इच्छा मरणाची परवानगी तरी द्या, अशी मागणीदेखील शिकलगार कुटुंबीयांनी केली. यावर पालकमंत्री या नात्याने मी न्याय मिळवून देईन, दोषींना कठोर शासन होईल, अशी ग्वाही शंभूराज देसाई यांनी शिकलगार कुटुंबीयांना दिली.

शिवाजी महाराजांची बदनामी करू नका: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री हुसेन दलवाई यांनीही पुसेसावळीला भेट दिली. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन जाती-धर्मात द्वेष पसरवणारे नक्कीच छत्रपतींचे अनुयायी नाहीत. अशा लोकांनी शिवाजी महाराजांची बदनामी करू नये, असे दलवाई म्हणाले. औंध येथे पोलीस अधीक्षक समीर शेख, खटावच्या प्रांताधिकार्‍यांशी त्यांनी चर्चा केली. दंगलीत नुकसान झालेल्या प्रार्थनास्थळाची पाहणी केली. दंगलीत मृत्यू झालेल्या तरुणाच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन देखील केले.

हेही वाचा:

  1. Satara Riots Case : सातारा दंगल प्रकरण; सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट करणाऱ्यांचा 'पीएफआय'शी संबंध?
  2. Riots in Satara : सोशल मीडियावर टाकलेल्या वादग्रस्त पोस्टच्या वादातून साताऱ्यात दंगल; एकाचा मृत्यू, इंटरनेट सेवा बंद
  3. Satara Riots Case : सातार्‍यातील इंटरनेट सेवा तीन दिवसांनी पूर्ववत; दंगलग्रस्त पुसेसावळीतील तणाव निवळला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.