सातारा - कारगिल युद्धातील हुतात्मा जवान गजानन मोरे यांचे सर्वांनी स्मरण ठेवले पाहिजे. त्यांच्या कुटुंबाला सातारा शहराजवळ चार गुंठे जागा देणार असल्याची घोषणा राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी केली. Martyr of Kargil War Gajanan More जिल्हा प्रशासनाने जागेचा प्रस्ताव शासनाकडे सादर करावा, असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी दिले आहेत.
गजानन मोरे यांच्या अर्धाकृती पुतळ्याला देसाईंनी पुष्पचक्र अर्पण पाटण तालुक्यातील भुडकेवाडी गावचे जवान गजानन मोरे यांच्या अर्धाकृती पुतळ्याला देसाईंनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. तसेच, मोरे कुटुंबाला शासनाच्या वतीने जागा देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. यावेळी उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटे, ग्रामविकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई, पाटणचे प्रांताधिकारी सुनील गाडे, तहसिलदार रमेश पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक अजित बोऱ्हाडे, मोरे कुटुंबीय आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
राज्यातील सरकार सर्वसामान्यांचे विकास ही कधीही न थांबणारी प्रक्रिया असून राज्यातील सध्याचे सरकार सर्वसामान्यांचे सरकार आहे. यापुर्वी तारळे परिसरातील गावांच्या विकासाला निधी उपलब्ध करुन देण्यात आला होता. यापुढेही निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही शंभूराजे देसाईंनी दिली आहे.
हेही वाचा - सोनाली फोगटचा नवा व्हिडीओ आला समोर, क्लबमध्ये मिळत होते ड्रग्ज, पहा सीसीटीव्ही फुटेज