ETV Bharat / state

आशिर्वादाचा हात अखंड महाराष्ट्रावर कायम राहावा; शंभूराज देसाईंचे गणरायाला साकडं - गणेश विसर्जन २०२०

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सातारा नगरपालिकेने तयार केलेल्या कृत्रिम तलावात गणेश मूर्तीचे विसर्जन करत आपल्या लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप दिला.

shambhuraj desai home Ganesh Visarjan in satara
आशिर्वादाचा हात अखंड महाराष्ट्रावर कायम रहावा; शंभूराज देसाईंचे गणरायाला साकडं
author img

By

Published : Aug 27, 2020, 8:55 PM IST

सातारा - गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सातारा नगरपालिकेने तयार केलेल्या कृत्रिम तलावात गणेश मूर्तीचे विसर्जन करत आपल्या लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप दिला. कृपाशिर्वादाचा हात अखंड महाराष्ट्रावर कायम रहावा हेच मागणे गणरायाला मागितले असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रसंगी त्यांनी 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' असा जयघोष केला.

सातारा नगरपालिकेने गणेश मूर्ती विसर्जनासाठी शहरात कृत्रिम तलावाची उभारणी केली आहे. पालिकेने हा तलाव शहरातील हुतात्मा स्मारक येथे तयार केले आहे. या कृत्रिम तलावात गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आपल्या घरातील गणेश मूर्तीचे विसर्जन केले. या प्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, 'कोरोनाच्या संकटामुळे यावर्षी आपण सर्वांनीच साध्या पद्धतीने गणरायाचे स्वागत केले. धार्मिक वातावरणात सात दिवस गणरायाचा उत्सव साजरा केला. आज मांगल्याच्या वातावरणात लाडक्या गणरायाला निरोप देत आहोत.'

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिला गणरायाला निरोप...
पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी कृत्रिम तलावाची निर्मीती हा पर्याय योग्य आहे. हा उपक्रम सातारा नगरपालिकेने चांगल्या पद्धतीने राबवला असे सांगत देसाई यांनी नगरपालिकेचे कौतूक केले. गणपती बाप्पा, हे कोरोनाचे संकट लवकर दूर करा. यावर्षीचा उत्सव करायचा बाकी राहिला आहे तो यापेक्षा दुप्पट उत्साहात, आनंदात, पुढच्या वर्षी साजरा करण्याची संधी आम्हा सर्वांना द्या. तसेच आशिर्वादाचा हात अखंड महाराष्ट्रावर कायम ठेवावा, अशी प्रार्थना गणरायाकडे केली असल्याचे देसाई यांनी सांगितलं.

हेही वाचा - चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीची कुऱ्हाडीने घाव घालून हत्या, पाटण तालुक्यातील घटना

हेही वाचा - फलटण येथील निकोप रुग्णालयात इतर आजार असणाऱ्या रुग्णांची हेळसांड

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.