ETV Bharat / state

कोरोनामुळे शिखर शिंगणापूरची शंभू महादेव यात्रा रद्द - Shikhar shingnapur festivals news

शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेवाची यंदाची यात्रा रद्द करण्यात आलेली आहे. याबाबतचे आदेश सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी काढले आहेत. त्यामुळे भाविकांची यात्रेला येऊ नये, असेही आवाहन त्यांनी केले आहे.

Shikhar shingnapur
Shikhar shingnapur
author img

By

Published : Apr 21, 2021, 6:27 PM IST

सातारा - महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेवाची वार्षिक चैत्र यात्रा कोरोनामुळे रद्द करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आज (21 एप्रिल) जारी केले आहेत.

महाराष्ट्रातून येतात लाखो भाविक-

शिंगणापूर येथील शंभू महादेवाची वार्षिक यात्रा 17 ते 27 एप्रिल या कालावधी आहे. यात्रेचा मुख्य दिवस 23 व 24 एप्रिल 2021 हा आहे. शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेव यात्रेस सातारा जिल्ह्यातील तसेच सोलापूर, अहमदनगर, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलढाणा, सांगली, उस्मानाबाद, बीड या जिल्ह्यातूनही भाविक मोठ्या प्रमाणावर येतात.

सीमेवर होणार अटकाव-

पर जिल्ह्यातून येणाऱ्या भाविकांना आपल्या जिल्ह्याच्या सीमेवर अटकाव करण्यात येणार आहे. त्यामुळे कोणीही या यात्रेसाठी येऊ नये, असे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आदेशात नमूद केले आहे. याबाबत पोलीस अधीक्षक सोलापूर, अहमदनगर, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलढाणा, सांगली, उस्मानाबाद, बीड यांनाही कळविण्यात आले आहे, असे पोलीस अधिक्षक अजयकुमार बंसल यांनी म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.