ETV Bharat / state

Balasaheb Desai Sugar Mill Election : लोकनेत्याची चौथी पिढी मैदानात, शंभूराजे देसाईंच्या मुलाने कारखाना निवडणुकीसाठी भरला अर्ज - बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना निवडणूक

लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या ( Balasaheb Desai Sugar Mill Election ) पंचवार्षिक निवडणुकीसाठी लोकनेत्यांचे नातू आणि गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांचे पुत्र यशराज देसाई ( Yashraj Desai ) यांचा अर्ज दाखल झाला आहे.

Yashraj Desai
Yashraj Desai
author img

By

Published : Jun 25, 2022, 6:45 PM IST

सातारा - मरळी-दौलतनगर (ता. पाटण) येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी ( Balasaheb Desai Sugar Mill Election ) नातू आणि गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांचे पुत्र यशराज देसाई यांचा अर्ज दाखल झाला आहे. या माध्यमातून लोकनेत्यांच्या चौथ्या पिढी सहकार-राजकीय मैदानात उतरली आहे.

लोकनेत्यांनंतर शंभूराजेंनी आणले गतवैभव - लोकनेते बाळासाहेब देसाई यांना पोलादी पुरूष म्हटलं जायचे. सातारा जिल्ह्यात तसेच पाटण तालुक्यात त्यांचा मोठा लौकीक होता. राज्याच्या मंत्रिमंडळात त्यांनी विविध खात्याची मंत्रीपदे भूषविली. कोयना धरण निर्मिती तसेच विनाशकारी भूकंपानंतर बाधितांच्या पुनर्वसनासाठी त्यांनी अहोरात्र कष्ट घेतले. गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळावे म्हणून ईबीसी सवलत सुरू केली. अशा लोकाभिमुख कामामुळे त्यांना लोकनेते ही पदवी देण्यात आली. त्यांच्या निधनानंतर देसाई घराण्याचा राजकीय दबदबा कमी झाला. मात्र, त्यांचे नातू आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी राजकीय मैदानात उतरल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते विक्रमसिंह पाटणकर यांचा पराभव करून संघर्षाने पाटणची आमदारकी मिळविली. तीनवेळा त्यांनी विधानसभेची निवडणूक जिंकली आहे. देसाई गट सक्षम करून देसाई घराण्याचे गतवैभव परत आणले आहे.

21 व्या वर्षी कारखान्याचे चेअरमन - लोकनेत्यांचे सुपत्र शिवाजीराव देसाई यांच्या निधनानंतर कारखान्याची सूत्रं शंभूराजे देसाई यांच्याकडे आली. 1986 मध्ये वयाच्या 21 व्या वर्षी ते कारखान्याचे चेअरमन झाले. आशिया खंडात सहकारी संस्थेचे सर्वात कमी वयाचे ते चेअरमन ठरले होते. त्यानंतर 1992 ला सातारा जिल्हा परिषदेचे सदस्य झाले. युती सरकारच्या काळात 1997 ला सहकार परिषदेचे अध्यक्ष (राज्यमंत्री) झाले. 1999 ला त्यांनी पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली. परंतु, अपयश आले. मात्र, 2004 ला पहिल्यांदा ते आमदार झाले. 2004, 2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत ते विजयी झाले.

देसाई घराण्याच्या चौथ्या पिढीचे लाँचिंग - गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचे सुपूत्र आणि लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे पणतू यशराज देसाई यांच्या माध्यमातून लोकनेत्यांची चौथी पिढी कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने राजकारणात सक्रिय होत आहे. यशराज देसाई यांनी कारखाना निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे कारखान्याच्या नेतृत्वाची सुत्रं देसाई घराण्याच्या चौथ्या पिढीच्या हाती येणार आहेत. उच्चशिक्षित असलेल्या यशराज देसाई यांच्या लाँचिंगमुळे पाटण विधानसभा मतदार संघातील देसाई गटाला तरूण चेहरा लाभणार आहे.

हेही वाचा - Eknath Shinde Group Press : आमची एवढीच अपेक्षा आहे की, सेना भाजप एकत्र यावी - बंडखोर आमदार दिपक केसरकर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.