ETV Bharat / state

सातारा जिल्ह्यात कोविड लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू

सातारा जिल्ह्यात कोविड लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे.

author img

By

Published : Mar 5, 2021, 3:07 PM IST

Second phase of covid vaccination started in Satara district
सातारा जिल्ह्यात कोविड लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू

सातारा - सातारा जिल्ह्यात कोविड लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. 60 वर्षांवरील नागरिकांना तसेच 45 वर्षावरील व्याधी असणाऱ्या नागरिकांना आधी आपले रजिस्ट्रेशन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.

येथे करा नोंदणी -

गर्दी टाळण्यासाठी नागरिकांनी ऑनलाइन रजिस्ट्रेशन करावे. जिल्ह्यात असणाऱ्या लोकसेवा केंद्रामध्येही रजिस्ट्रेशन करता येईल. केवळ पाच रुपये शुल्क आकारून रजिस्ट्रेशन करावे. तसेच मोबाईल ॲप वरूनही नोंदणी करता येईल. 45 वर्षांवरील व्याधी असणाऱ्या नागरिकांनी वेबसाईटवरील आजारांची यादी तपासून घ्यावी. खासगी रुग्णालयात 250 रुपयांना लस मिळेल. या लसीसाठी नागरिकांनी http://selfregistration.coin.gov.in या लिंकचा वापर करून नोंदणी करावी. ऑनलाईन नोंदणीची अडचण असल्यास आधार कार्ड घेऊन लसीकरण सत्राच्या ठिकाणी नोंदणी करून घ्यावी. सध्या 39 शासकीय व दहा खासगी आरोग्य संस्थेत लसीकरण सुरू आहे.

कुठे मिळणार लस-

शासकीय आरोग्य संस्थांमध्ये क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा, उपजिल्हा रुग्णालय कराड व फलटण, ग्रामीण रुग्णालय पाटण, ढेबेवाडी, कोरेगाव, दहिवडी, खंडाळा, वडूज, महाबळेश्वर, प्राथमिक आरोग्य केंद्र म्हसवड, चिंचनेर वंदन, नागठाणे, कन्हेर, काले, उंब्रज, पुसेगाव, पाचगणी, अहिरे, बावधन, कवठे, कुडाळ, तारळे, तळमावले, मायणी, पुसेसावळी, मार्डी, मलवडी, राजाळे, साखरवाडी, वाठार स्टेशन, रहिमतपूर तसेच नागरी आरोग्य केंद्र गोडोली, कस्तुरबा रुग्णालय या शासकीय रुग्णालयांमध्ये सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत कोविड-19 चे लसीकरण मोफत देण्यात येणार आहे. तसेच नोंदणीकृत खासगी संस्था अँन्को लाइफ क्लीनिक तामजाई नगर, संजीवन हॉस्पिटल सातारा, कृष्णा महाविद्यालय कराड, सह्याद्री कराड, शारदा हॉस्पिटल कराड, गुजर हॉस्पिटल कराड, मानसी हॉस्पिटल खंडाळा, पाटील हॉस्पिटल कोरेगाव, मंगलमूर्ती क्लिनिक सातारा, घोटवडेकर हॉस्पिटल वाई या ठिकाणी 250 रुपयात लस देण्यात येणार आहे, असेही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सांगितले.

हेही वाचा- सुशांतसिंह ड्रग्ज प्रकरणी एनडीपीएस न्यायालयात एनसीबीने केले आरोपपत्र दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.