ETV Bharat / state

बेपत्ता मुलींचा १५ तासात शोध; पोलिसांच्या तत्परतेने कुटुंबीय गहिवरले - कराड पोलीस

घरातून निघून गेलेल्या दोन अल्पवयीन मुलींना अवघ्या 15 तासात शोध घेण्यात कराड शहर पोलिसांना यश आले. दोनपैकी एका मुलीचा (शनिवारी) वाढदिवस असल्याचे समजताच कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील आणि पोलीस कर्मचार्‍यांनी पोलीस ठाण्याच्या आवारात केक कापून त्या मुलीचा वाढदिवसही साजरा केला. बेपत्ता मुलींचा पोलिसांनी तत्परतेने शोध घेऊन आणि वाढदिवस साजरा करत दाखविलेल्या खाकीतील माणुकीमुळे त्या मुलींचे कुटुंबीय गहिवरून गेले.

कराड शहर पोलीस
कराड शहर पोलीस
author img

By

Published : Mar 8, 2020, 4:19 PM IST

कराड (सातारा) - किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून घरातून निघून गेलेल्या दोन अल्पवयीन मुलींना अवघ्या 15 तासांत शोध घोण्यात कराड शहर पोलिसांना यश आले. दोनपैकी एका मुलीचा (शनिवारी) वाढदिवस असल्याचे समजताच कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील आणि पोलीस कर्मचार्‍यांनी पोलीस ठाण्याच्या आवारात केक कापून त्या मुलीचा वाढदिवसही साजरा केला. बेपत्ता मुलींचा पोलिसांनी तत्परतेने शोध घेऊन आणि वाढदिवस साजरा करत दाखविलेल्या खाकीतील माणुकीमुळे त्या मुलींचे कुटुंबीय गहिवरून गेले.

बेपत्ता मुलींचा पंधरा तासात शोध

सांगली जिल्ह्यातील कडेगावमधील मजुरी करणार्‍या कुटुंबातील दोन अल्पवयीन मुली किरकोळ वादाच्या कारणावरून कोणास काहीही न सांगता शुक्रवारी (दि. 6) दुपारी घरातून निघून गेल्या होत्या. त्यामुळे त्या मुलींचे कुटुंबीय सैरभैर झाले. त्यांनी सर्वत्र शोधाशोध केली. परंतु, मुली सापडल्या नाहीत. त्या मुली कराडकडे गेल्या असाव्यात, या शक्यतेने त्या मुलींचे कुटुंबीय कराडला आले. कराड शहर पोलीस ठाण्यात येऊन त्यांनी घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने त्यांची दखल घेतली. डीवायएसपी सूरज गुरव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांना घटनेची माहिती देण्यात आली. त्यांनी या गुन्ह्याचा तपास उपनिरीक्षक भरत पाटील यांच्याकडे सोपवून तपासाबाबत सूचना केल्या. उपनिरीक्षक पाटील यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली. दोन्ही मुली मलकापूर (ता. कराड) येथील डीमार्टच्या परिसरात गेल्या होत्या, अशी माहिती त्यांना मिळाली. तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासून उपनिरीक्षक पाटील यांनी पुढील अंदाज बांधला. गोपनीय माहितीच्या आधारे दोन्ही मुली मिरजमध्ये असल्याची माहितीही त्यांना मिळाली.

हेही वाचा - महिला दिन विशेष : पतीला यकृत देणारी 'ती' ठरली कलियुगातली सावित्री

उपनिरीक्षक भरत पाटील यांनी हवालदार सतीश जाधव, कॉन्स्टेबल भुताळे, गोसावी, पाटील आणि वसीम संदे या कर्मचार्‍यांना घेऊन तातडीने मिरज गाठले आणि दोन्ही मुलींना ताब्यात घेऊन शनिवारी सायंकाळी कराड शहर पोलीस ठाण्यात आणले. मुलींच्या कुटुंबीयांनाही बोलावून घेण्यात आले. त्यांच्याकडून माहिती घेत असताना दोनपैकी एका मुलीचा आज (शनिवारी) वाढदिवस असल्याचे समजले. उपनिरीक्षक भरत पाटील यांनी ही बाब वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांना सांगितली. मग अधिकारी, कर्मचार्‍यांनी त्या मुलीचा वाढदिवस साजरा करण्याचे ठरविले. तातडीने पोलिसांनी केक आणला. शनिवारी कराड शहर पोलीस ठाण्यात तक्रार निवारण दिन होता. त्यामुळे काही सामाजिक कार्यकर्तेही आले होते. पोलीस निरिक्षक बी. आर. पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे, उपनिरीक्षक भरत पाटील, शिवराम खाडे, पोलीस कर्मचारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत त्या मुलीचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

हेही वाचा - महाबळेश्वरमध्ये मुलांना पळवणारी तृतीय पंथीयांची टोळी अटकेत

कराड शहर पोलिसांनी दाखविलेली तत्परता आणि माणुसकीमुळे त्या मुलींच्या कुटुंबीयांना अक्षरश: गहिवरून आले. त्यांनी अधिकारी आणि कर्मचार्‍यांना धन्यवाद दिले. तसेच बेपत्ता मुलींचा शोध घेत एका मुलीचा वाढदिवस साजरा करून मुलीसुध्दा या देशाचे भविष्य आहेत. त्यांचाही समाजाने सन्मान राखला पाहिजे, असा कृतीशील संदेश कराडच्या पोलिसांनी जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला दिला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.