सातारा - सातारकरांची तहान भागविणारे कास धरण ओव्हरफ्लो झाले आहे. धरणात सध्या 48 फूट पाणीसाठा झाला आहे. धरण 60 टक्के भरले ( kas dam water 60 percentage ) आहे. धरणाच्या सांडव्यावरून वाहणाऱ्या पाण्यामुळे कास धरणाला भुशी डॅमचा फील आला आहे.
संततधार पाऊस आणि दाट धुक्याची चादर - कास धरणाची उंची वाढविण्याचे काम सुरू आहे. याशिवाय सांडव्याच्या समोर सिमेंटच्या पायर्या आणि दोन्ही बाजूला सिमेट काँक्रीटचे कट्टे बांधण्यात आले आहेत. धरण ओव्हरफ्लो झाल्यामुळे सांडव्यासमोरील पायऱ्यांवरून पाणी वाहत आहे. यामुळे कास धरणाला भुशी डॅमचा फील आला आहे. पावसाची संततधार आणि धुक्यामुळे कास धरण परिसराचे सौंदर्य खुलले आहे.
सातारकरांच्या पाण्याची चिंता मिटली - सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास धरणात 60 टक्के पाणीसाठा झाल्यामुळे सातारकरांच्या पाण्याची चिंता मिटली आहे. धरण परिसरात मुसळधार पाऊस सुरू असल्याने उर्वरीत धरण लवकरच पूर्ण क्षमतेने भरेल. सध्या कास धरणाच्या परिसरात पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. त्यामुळे कास धरणाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पर्यटकांच्या वाहनांची मोठी वर्दळ पाहायला मिळत आहे.
हेही वाचा - शिवसेनेला मोठा धक्का बसणार?, कोल्हापुरातील दोन्ही खासदार 'जय महाराष्ट्र' करण्याच्या तयारीत