ETV Bharat / state

सातारा : अजय कुमार बन्सल नवे पोलीस अधीक्षक, तेजस्वी सातपुते यांची बदली

गेले सहा महिने सर्वच सातारकरांनी सकारात्मकतेने पोलिसांना कोविड काळात प्रतिसाद दिला. त्याच पद्दतीने पुढील काळातही ते पोलीस, आरोग्य व एकूणच जिल्हा प्रशासनाला साथ देतील, असा संदेश पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिला.

पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते
पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते
author img

By

Published : Oct 7, 2020, 9:09 PM IST

सातारा - पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची सोलापूर ग्रामीणला बदली झाली असून त्यांच्या जागी गडचिरोलीहून अजय कुमार बन्सल यांची सातारा पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती झाली आहे.

प्रतिक्रिया देताना पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते

दीड वर्षापूर्वी तेजस्वी सातपुते यांची पुण्यातून साताऱ्याला बदली झाली होती. प्रशासनाला आव्हान ठरलेल्या कोविड काळातही त्यांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखली. गेल्या आठवड्याभरापासून सातपुते यांच्या बदलीची सातारा जिल्ह्यात चर्चा होती. या चर्चांकडे लक्ष न देता त्यांनी पोलीस दलाच्या कामगिरीवर परिणाम होऊ दिला नाही. याच काळात अत्यंत गुंतागुंतीचा व पोलिसांचे कौशल्य पणाला लावणारे काळज येथील बालक अपहरण व खूनप्रकरण घडले. या गुन्ह्याचा तपास त्यांनी व त्यांच्या पथकाने कौशल्याने लावला होता. राजकीय कारणातून त्यांची बदली झाल्याची पोलीस वर्तुळात चर्चा आहे.

गेले सहा महिने सर्वच सातारकरांनी सकारात्मकतेने पोलिसांना कोविड काळात प्रतिसाद दिला. त्याच पद्दतीने पुढील काळातही ते पोलीस, आरोग्य व एकूणच जिल्हा प्रशासनाला साथ देतील, असा संदेश पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिला.

हेही वाचा- साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांची केंद्रीय कृषी स्थायी समितीवर निवड

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.