ETV Bharat / state

गावठी पिस्तूलासह ३ काडतूसे जप्त, कराडजवळ 'एलसीबी'ची कारवाई

author img

By

Published : Feb 7, 2021, 10:14 PM IST

पोलिसांनी सुर्ली येथून एका संशयिताकडून ३ काडतूसांसह एक देशी बन‍ावटीची पिस्टल जप्त केली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

satara Police recover 1 pistols, cartridges from 2 accused in Surli karad
गावठी पिस्तूलासह ३ काडतूसे जप्त, कराडजवळ 'एलसीबी'ची कारवाई

सातारा - सुर्ली (ता. कराड) येथून एका संशयिताकडून पोलिसांनी ३ काडतूसांसह एक देशी बन‍ावटीची पिस्टल जप्त केली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. अमोल जगन्नाथ माने (रा. कराड) व संभाजी संपत मदने (रा. कामठी) अशी संशयितांची नावे आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे व आनंदसिंग साबळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

गोपनीय माहितीची मोठी मदत
६ फेब्रुवारी रोजी पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एक व्यक्ती सुरली गावच्या बसस्टॉप जवळ गावठी पिस्टल बाळगून फिरत आहे. पोलीस पथकाने घटनास्थळी जाऊन संशयितास ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी पिस्टल व ३ काडतूसे मिळाली. पोलिसांनी या प्रकरणात एकूण ६५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अधिक चौकशीत, त्याला हे पिस्टल व काडतूसे दुसऱ्या एका व्यक्तीने त्याच्याकडे ठेवण्यास दिले आहे, असे सांगितले.

दुस-या फरार संशयितास अटक
दुसरा संशयित फरार आरोपी असून तो वांगी (जि.सांगली) येथे असल्याची माहिती मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा लावून त्यास शिताफीने ताब्यात घेतले. दोन्ही संशयितांविरुध्द कराड तालुका पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियमाप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, आनंदसिंग साबळे, सहायक फौजदार जोतीराम बर्गे, उत्तम दबडे, सुधीर बनकर, अतिश घाडगे, विजय कांबळे, संतोष सपकाळ शरद घेचले, सायीर मुल्ला, प्रविण फडतरे, निलेश काटकर, प्रमोद सावंत, अमित सपकाळ, गणेश कचरे, मुनीर मुल्ला, गणेश कापरे, विक्रम पिसाळ, रविंद्र वाघमारे, मंगेश महाडीक, अर्जुन शिरतोडे, अजित कणे, राजकुमार ननावरे, रोहित निकम, सचिन ससाणे, मयूर देशमुशा, मोहसीन मोमीन, केतन शिंदे यांनी ही कारवाई केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.