ETV Bharat / state

satara crime : सातारा पोलीस अधीक्षकांचा दणका, 13 सराईत गुन्हेगारांच्या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई

author img

By

Published : Feb 15, 2023, 7:44 AM IST

फलटणमधील 13 सराईत गुन्हेगारांच्या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी गुन्हेगारांना मोठा दणका दिला आहे. खुनाचा प्रयत्न, दरोडा, खंडणी, जबरी चोरी, जबर दुखापत, बेकायदेशीर जमाव जमवून मारहाण, अपहरण आणि दमदाटीचे गंभीर गुन्हे या टोळीवर नोंद आहेत.

satara crime
फलटणमधील सराईत गुन्हेगारांच्या टोळीला मोक्का

सातारा : साताऱ्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढताना दिसत आहे. सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी नुकतीच मोठी कारवाई केली. ज्यात सातारा पोलीस अधीक्षकांनी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांना पत्र पाठवले. ज्यात वाढत्या गुन्हागारीला आळा घालण्यासाठी कारवाई करणे गरजेचे असल्याचे नमूद करत या प्रस्तावाला मंजुरी मागितली होती. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांना मंजूरी देताच त्यांनी ही धडक कारवाई केली. या कारवाईमुळे जिल्ह्यातील गुन्हेगारी टोळ्यांचे धाबे दणाणले आहेत.

बोडरे टोळीवर 23 गुन्हे : सुरज बोडरे, ज्ञानेश्वर उर्फ नन्या बोडरे, रणजित भंडलकर, तानाजी लोखंडे, शरद उर्फ बाबू पवार, शंभू ननावरे, वैभव चक्हाण, सनी बोडरे, श्रीकांत बोडरे, गणेश मदने (सर्व रा. खामगाव, ता. फलटण), उमेश खोमणे (रा. खराडवाडी, ता. फलटण), सचिन मंडले (रा. साखरवाडी, ता. फलटण) आणि अमर बोडरे (रा. पिंपळवाडी, ता. फलटण), अशी मोक्का अंतर्गत कारवाई झालेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत. सुरज बोडरे हा टोळी प्रमुख असून इतर संशयित त्याचे साथीदार आहेत. या टोळीवर विविध कलमान्वये 23 गंभीर गुन्हे नोंद आहेत. या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव फलटण ग्रामीण ठाण्याकडून पोलीस अधीक्षकांना पाठविण्यात आला होता.

फलटण तालुक्यात टोळीची दहशत : टोळी प्रमुख सुरज बोडरे हा दहशत पसरविण्यासाठी टोळीचा वापर करत असल्याचे निष्पन्न झाले. टोळीतील सदस्यांना एकत्र करुन त्याने अनेक गुन्हे केले होते. या टोळीविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती संकलित करुन त्यांच्यावर संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये कारवाई करण्याचा प्रस्ताव सातारा पोलीस अधीक्षकांना पाठविण्यात आला होता. त्या प्रस्तावाला कोलहापूर परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी मंजुरी दिली .

बारा वर्षानंतर दोन टोळ्यांना मोक्का : 2010 मध्ये फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याची निमिर्ती झाली. परंतु, फलटण ग्रामीण हद्दीत बारा वर्षे मोक्काअंतर्गत एकही कारवाई झाली नव्हती. बारा वर्षानंतर दोन टोळ्यांवर मोक्काची कारवाई झाली. धन्यकुमार गोडसे यांनी पोलीस निरीक्षक पदाचा कार्यभार घेतल्यानंतर लोकांची फसवणूक करून त्यांना लुबाडणार्‍या दिगंबर आगवणेसह त्याच्या सहा साथीदारांच्या टोळीला मोक्का लागला. त्यानंतर आता सूरज बोडरे याच्या टोळीवर मोक्काची कारवाई झाली असून दोन्ही गुन्हेगारी टोळ्यांमधील 19 गुन्हेगार जेरबंद झाले आहेत.

हेही वाचा :Satara Crime : डाळीबांच्या शेतातून १ कोटीचा गांजा जप्त, शेत मालकास अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.