सातारा- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना रविवारी रात्री नऊ वाजता नऊ मिनिटांसाठी वीजेवरील दिवे बंद करून मेणबत्ती, दिवे, मोबाईलचे फ्लॅश किंवा टॉर्च लावण्याचे आवाहन केले होते. पंतप्रधांनाच्या या आवाहनाला सातारा तसेच ग्रामीण भागातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.
जिल्ह्यातील अनेक मंदिरे तसेच तुळशी वृंदावन या ठिकाणी पणत्यांची आरास पाहायला मिळत होती. अनेक सोसायटीच्या गॅलरीत मेणबत्ती आणि दिवे लावत पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला.
नरेंद्र मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देताना काही ठिकाणी तर फटाके देखील फोडण्यात आले आहेत.कोरोनाचा सर्वाधिक फटका आपल्या ग्रामीण भागातील गरीब जनतेला बसला आहे. त्यांना या अंधःकारामधून बाहेर कढण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. त्यासाठीच ५ एप्रिल रोजी रात्री नऊ वाजता तुमची नऊ मिनिटे हवी आहेत' असे आवाहन नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात केले होते.