ETV Bharat / state

भाजपमध्ये गेल्यास उदयनराजेंना पोटनिवडणुकीत दगाफटका होण्याची शक्यता? - उदयनराजेंना पोटनिवडणुकीत दगाफटका होण्याची शक्यता

कार्यकर्त्यांनी उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाला विरोध दर्शवल्यामुळे सध्यातरी ते राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र, उदयनराजेंच्या तळ्यात मळ्यातल्या भूमिकेमुळे साताऱ्यात राजकीय तर्क वितर्कांना उधान आले आहे.

खासदार उदयनराजे भोसले
author img

By

Published : Sep 10, 2019, 8:41 PM IST

सातारा - राष्ट्रवादीचे नेते व साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले हे भाजपमध्ये जाणार, असल्याच्या चर्चांना तुर्तास तरी ब्रेक लागलेला आहे. कार्यकर्त्यांच्या विरोधामुळे सध्यातरी ते राष्ट्रवादीतच राहतील, असे दिसत आहे. पण त्यांच्या पक्ष बदलाच्या भुमिकेमुळे अनेक तर्क लावले जात आहेत.

हेही वाचा... 'मावळा छत्रपतींचे मन वळवू शकत नाही', उदयनराजेंच्या भेटीनंतर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया

सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जातो. स्थानिक स्वराज्य संस्थांपासून विधानसभा व लोकसभा मतदारसंघातही या जिल्ह्यात राष्ट्रवादीचा वरचष्मा आहे. मात्र, नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजपला देशात आणि राज्यात निर्भेळ यश मिळाले. महाराष्ट्रात येवू घातलेल्या विधानसभा निवडणुकीत आपले राजकीय करिअर संपुष्टात येवू नये, या भीतीने काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील अनेक दिग्गजांनी भाजप अथवा शिवसेनेची वाट चोखाळलेली आहे. यामध्ये सातारा-जावळी विधानसभेचे आमदार शिवेंद्रराजे यांनीही पक्षांतराचा गमजा गळ्यात घालून भाजपात प्रवेश मिळवला.

हेही वाचा... मंत्रिपदाच्या तुकड्यासाठी भाजपवासी झालात, शिवेंद्राराजेंवर जयंत पाटलांची टीका

शिवेंद्रराजेंच्या प्रवेशामुळे उदयनराजेही भाजपात जाणार, अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगत होत्या., परंतू कार्यकर्त्यांच्या कौलाशिवाय मुहूर्त ठरवणार नाही, अशी भूमिका उदयनराजेंनी घेतली होती. सोमवारी सकाळी उदयनराजेंनी पुणे येथील निवासस्थानी निवडक कार्यकर्त्यांबरोबर बैठक घेवून पक्षांतराबाबत चर्चा केली. मात्र कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीतच रहा, असा सूर आळवल्यामुळे उदयनराजेंनीही हा कौल मान्य करीत सध्यातरी सबुरीने घ्यायला हवे, असा निर्णय घेतल्याचे समजते.

हेही वाचा... शिवेंद्रराजे हटाव सातारा भाजप बचाव, शिवेंद्रराजेंच्या उमेदवारीला विरोध

मागील आठवड्यात खासदार डॉ. अमोल कोल्हे व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी उदयनराजेंची सातारा येथील शासकीय विश्रामगृहावर भेट घेवून त्यांना भाजप प्रवेश करु नका, अशी विनंती केली होती. यात त्यांना यश न आल्याने उदयनराजे भाजपामध्ये प्रवेश करतील, अशी अटकळही बांधली जात होती. मात्र उदयनराजे भाजपात गेल्यास होणार्‍या पोटनिवडणुकीत त्यांना दगाफटका होण्याची शक्यता जास्त असल्यामुळे कार्यकर्त्यांनी ताकही फुंकून पिण्याचा सल्ला राजेंना दिल्याचे समजत आहे. यामुळे सातारा जिल्ह्यातील राजकारणावर मांड ठेवण्यासाठी उदयनराजेंना भाजप शिवाय पर्याय नाही, असे चित्र जरी दाखवले जात असले, तरी सध्या या चर्चा हवेवरच राहतील असे दिसत आहे.

हेही वाचा... यात्रा तर सगळ्याच्या असतात, आमची तर जत्रा - छत्रपती उदयनराजे भोसले​​​​​​​

Intro:सातारा लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे भाजपमध्ये जाणार, या चर्चांना तुर्तास तरी ब्रेक लागलेला आहे. खा. उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांनी भाजप प्रवेशाला विरोध दर्शविल्यामुळे सध्यातरी उदयनराजे राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र, उदयनराजेंच्या तळ्यात मळ्यातल्या भूमिकेमुळे सातार्‍यात राजकीय सस्पेन्स निर्माण झाला आहे.Body:सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जातो. स्थानिक स्वराज्य संस्थांपासून विधानसभा व लोकसभा मतदारसंघातही या जिल्ह्यात राष्ट्रवादीचा वरचष्मा आहे. मात्र, नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजपला देशात आणि राज्यात निर्भेळ यश मिळाले. महाराष्ट्रात येवू घातलेल्या विधानसभा निवडणुकीत आपले राजकीय करिअर संपुष्टात येवू नये, या भीतीने कॉंग्रेस-राष्ट्रवादीमधील अनेक दिग्गजांनी भाजप-शिवसेनेची वाट चोखाळलेली आहे. यामध्ये सातारा-जावली विधानसभा मतदारसंघाचे आ. शिवेंद्रराजेंनीही पक्षांतराचा गमजा गळ्यात घालून भाजपात प्रवेश मिळवला. शिवेंद्रराजेंच्या प्रवेशामुळे उदयनराजेही भाजपात जाणार, अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून झडत होत्या. तारखाही ठरल्या. परंतू कार्यकर्त्यांच्या कौलाशिवाय मुहूर्त ठरवणार नाही, अशी भूमिका खा. उदयनराजेंनी घेतल्यामुळे काल सकाळपर्यंत सस्पेन्स निर्माण झाला होता. काल सकाळी खा. उदयनराजेंनी पुणे येथील निवासस्थानी निवडक कार्यकर्त्यांबरोबर बैठक घेवून पक्षांतराबाबत चर्चा केली. मात्र बिनीच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीतच रहा, असा सूर आळवल्यामुळे उदयनराजेंनीही हा कौल मान्य करीत सध्यातरी सबुरीने घ्यायला हवे, असा निर्णय घेतला. गेल्या आठवड्यात छत्रपती संभाजी फेम अभिनेते खा. डॉ. अमोल कोल्हे व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खा. राजू शेट्टी यांनी खा. उदयनराजेंची सातारा येथील शासकीय विश्रामगृहावर भेट घेवून भाजप प्रवेश करु नका, अशी विनंती केली होती. या पार्श्‍वभूमीवर उदयनराजे भाजपामध्ये प्रवेश करतील, अशी अटकळही बांधली जात होती. मात्र उदयनराजे भाजपात गेल्यास होणार्‍या पोटनिवडणुकीत उदयनराजेंना दगाफटका होण्याची शक्यता जास्त असल्यामुळे कार्यकर्त्यांनी ताकही फुंकून पिण्याचा सल्ला खा. उदयनराजेंना दिला असल्याचे वृत्त आहे. मात्र सातारा जिल्ह्यातील राजकारणावर मांड ठेवण्यासाठी उदयनराजेंना भाजप शिवाय पर्याय नाही, अशा चर्चाही जिल्ह्यात सुरु आहेत.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.