सातारा- आयुर्वेदिक काढ्यामुळे फलटणमध्ये बाप-लेकाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. रात्री कुटुंबासोबत जेवण करून सर्वांनी आयुर्वेदिक काढा पिऊन ते झोपी गेले. मध्यरात्रीच्या सुमारास त्रास होऊ लागल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र , उपचार सुरू असताना पहाटे त्यांचा मृत्यू झाला. अविनाश पोतेकर आणि अमित पोतेकर अशी मृत बाप-लेकाची नावे आहेत.
कुटुंबासमवेत जेवण करून सर्वांनी आयुर्वेदिक काढा पिल्यानंतर अविनाश पोतेकर आणि अमित पोतेकर यांना मध्यरात्रीच्या सुमारास त्रास होऊ लागला. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र , उपचार सुरू असताना पहाटे त्यांचा मृत्यू झाला. अन्नातून विषबाधा होऊन ही घटना घडल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
जेवल्यानंतर आयुर्वेदिक काढा पिला फलटण शहरातील गजानन चौकात राहणारे अविनाश रामभाऊ पोतेकर (वय ५५) आणि त्यांचा एकुलता एक मुलगा अमित (वय ३२ ) यांनी रविवारी रात्री कुटुंबासमवेत जेवण केले. त्यानंतर आयुर्वेदिक काढा पिऊन सर्वजण झोपी गेले. मध्यरात्रीच्या सुमारास अविनाश, मुलगा अमित आणि मुलीला अचानक त्रास होऊ लागला. एकाच कुटुंबातील तिघांची प्रकृती बिघडली. घटनेचे गांभीर्य पाहून त्यांना तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना पहाटे अविनाश पोतेकर आणि काही वेळातच मुलगा अमित यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मुलीच्या तब्येतीत सुधारणा झाली आहे. दरम्यान, बाप-लेकाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचे कारण समजू शकलेले नाही.
फलटण शहरात खळबळ- अविनाश पोतेकर आणि त्यांच्या एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूने फलटण या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. पिता-पुत्राचा मृत्यू विषबाधेमुळे झाला की अन्य कोणत्या कारणाने, हे शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. या घटनेमुळे फलटण शहरावर शोककळा पसरली आहे. या घटनेनंतर आयुर्वेद उपचार घेताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असे बोलले जात आहे. तसेच अन्नातील विषबाधा टाळण्यासाठी काळजी घेण्याची गरज देखील व्यक्त होत आहे.