ETV Bharat / state

सातारा रेल्वे पोलीस ठाणे सुरू करण्याची श्रीनिवास पाटील यांची लोकसभेत मागणी

author img

By

Published : Sep 25, 2020, 7:25 PM IST

लोकसभेच्या कामकाजात बोलताना बुधवारी साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी जिल्ह्यातून जाणाऱ्या लोहमार्गावर रेल्वेचे थांबे वाढवावेत, यासह प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सातारा रेल्वे पोलीस ठाणे सुरू करावे अशी मागणी केली.

खासदार श्रीनिवास पाटील
खासदार श्रीनिवास पाटील

सातारा - जिल्ह्यातून जाणाऱ्या लोहमार्गावर रेल्वेचे थांबे वाढवावेत यासह प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सातारा रेल्वे पोलीस ठाणे सुरू करावे, अशी मागणी खासदार श्रीनिवास पाटील यांनी बुधवारी लोकसभेत केली.

खासदार श्रीनिवास पाटील लोकसभेत बोलताना

सातारा जिल्ह्यातून जाणाऱ्या मध्य रेल्वे मार्गाच्या संदर्भातील मुद्दे लोकसभेत उपस्थित करत श्रीनिवास पाटील यांनी या मागण्या केल्या. ते म्हणाले, पुणे-मिरज-हुबळी मध्य रेल्वे मार्गावरील लोणंद या ठिकाणी मोठी बाजारपेठ व औद्योगिक क्षेत्र आहे. तसेच आषाढ महिन्यात संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी या ठिकाणावरून जात असते. या पालखी सोहळ्यास लोखो भाविकांची उपस्थिती असते. परंतु, हे शहर रेल्वे मार्गाच्या दोन्ही बाजूला वसलेले आहे. त्यामुळे एका बाजूवरून दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी नागरिकांना अडचणी निर्माण होत आहेत. याठिकाणी एक 'अंडर पास' व दोन 'ओव्हर ब्रीज' बांधल्यास ते नागरिकांच्या दृष्टीने सोयीचे ठरेल.

हेही वाचा - एनसीबी 'ड्रग्ज' तपास: एकाकडून दुसरा, दुसऱ्याकडून तिसरा, तिसऱ्याकडून अनेकांचे कसे होते संबंध?

दक्षिण व उत्तर राज्यातील काही नागरिक सातारा जिल्ह्यात स्थायिक आहेत. मात्र, त्यांना आपल्या गावी जाण्यासाठी पुणे किंवा मिरज रेल्वे स्थानकावर जावे लागते. ते रेल्वे प्रवाशांसाठी गैरसोयीचे ठरत आहे. त्यामुळे या ठिकाणी मध्य रेल्वेचे थांबे वाढवण्यात यावेत.

सातारा शहराजवळ एक रेल्वे पोलीस ठाणे मंजूर झाले आहे. मात्र, गेल्या दहा वर्षांपासून ते अद्याप कार्यान्वित झालेले नाही. परिणामी रेल्वे प्रवासादरम्यान चोरी झाल्यास, महिलांच्या बाबतीत काही गैर कृत्य किंवा अनुचित घटना घडल्यावर त्यासंदर्भातील तक्रार देण्यासाठी नागरिकांना पुणे किंवा मिरज या ठिकाणी जावे लागते. रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या व सोयीच्या दृष्टीकोनातून येथे मंजूर असलेले पोलीस ठाणे लवकरात लवकर सुरू करण्यात यावे, अशी मागणी देखील त्यांनी सभागृहात केली.

हेही वाचा - 'कृषी विधेयकातील अनेक मुद्दे काँग्रेसच्याही जाहीरनाम्यातील, मग विरोध का?'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.