ETV Bharat / state

कौतुकास्पद.! तिकीटाचे ७ रुपये नसतानाही त्यांनी परत केले 40 हजार - satara man shows loyatly's darshan

माण तालुक्यातील पिंगळी बुद्रुक येथे धनाजी यशवंत जगदाळे (वय 54) राहतात. त्यांची परिस्थिती अतिशय साधारण आहे. ते तालुक्यातील दहिवडी येथील आठवडा बाजारात भाजीपाला आणण्यासाठी गेले होते. मात्र, भाजीपाला घेतल्यानंतर त्यांचे पैसे संपल्यामुळे घरी जाण्यासाठी पैसे उरले नाहीत. पिंगळी ते दहिवडी अंतर 6 किमी आहे. एसटी बसचे 7 रुपये तिकीट आहे. मात्र, जवळ पैसे उरले नसल्याने धनाजी दहिवडी एसटी बसस्थानकातच झोपले.

धनाजी यशवंत जगदाळे
author img

By

Published : Nov 4, 2019, 1:56 PM IST

Updated : Nov 4, 2019, 7:46 PM IST

सातारा - आजच्या काळात प्रामाणिकपणा खूप कमी प्रमाणात पाहायला मिळतो. मात्र, जिल्ह्यातील एका व्यक्तीने जवळ प्रवासाच्या तिकीटासाठी पैसे नसतानाही सापडलेले तब्बल ४० हजार रुपये परत केल्याचा दुर्मिळ प्रकार समोर आला आहे. धनाजी असे या व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणामुळे माजी खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या पत्नी यांनी त्यांचा सत्कार केला.

कोतुकास्पद.! तिकीटाचे ७ रुपये नसतानाही त्यांनी परत केले 40 हजार

माण तालुक्यातील पिंगळी बुद्रुक येथे धनाजी यशवंत जगदाळे (वय 54) राहतात. त्यांची परिस्थिती अतिशय साधारण आहे. ते दहिवडी येथील आठवडा बाजारात भाजीपाला आणण्यासाठी गेले होते. मात्र, भाजीपाला घेतल्यानंतर त्यांचे पैसे संपल्यामुळे घरी जाण्यासाठी पैसे उरले नाहीत. पिंगळी ते दहिवडी अंतर 6 किमी आहे. एसटी बसचे 7 रुपये तिकीट आहे. मात्र, जवळ पैसे उरले नसल्याने धनाजी दहिवडी एसटी बसस्थानकातच झोपले.

हेही वाचा - दिंडोरी तालुक्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटूबांला आठवलेंकडून एक लाखाची मदत

रात्री झोपेत त्यांना जाग आली असता, त्यांच्या पायाजवळ तब्बल 40 हजार रुपयांचे बंडल आढळले. यानंतर त्यांनी मोठ्याने कुणाचे पैसे पडलेत का? असे विचारले. यानंतर टॉयलेटला गेलेली एक व्यक्ती आली आणि हे पैसे माझे आहेत. पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी घेऊन चाललो असल्याचेही त्या व्यक्तीने सांगितले. धनाजी यांना खात्री पटल्यावर त्यांनी ते पैसे त्या व्यक्तीला परत केले. धनाजी यांनी प्रामाणिकपणा दाखविला म्हणून त्या व्यक्तीने धनाजी यांना 1 हजार देऊ केले. मात्र, धनाजी यांनी नम्रपणे त्यांना नकार दिला आणि पिंगळीला घरी परत जाण्यासाठी फक्त 7 रुपये तिकिटाचे पैसे मागून घेतले.

हेही वाचा - ..तरचं ज्वालाग्रही पदार्थ वाहतूक करणाऱ्या जहाजांना परवानगी द्या - मायकल लोबो

प्रामाणिकपणाच्या या दर्शनानंतर दहिवडीचे आगारप्रमुख मोनाली पाटील, वाहतूक नियंत्रक सतीश सावंत, शैलेश देशमाने, या अधिकाऱ्यांनी धनाजी यांचे कौतुक केले. तसेच पिंगळी येथील श्रीकांत जगदाळे यांनी धनाजी यांना पेहराव दिला आणि त्यांचा सत्कार केला. यानंतर मागील आठवड्य़ात शुक्रवारी जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी देखील साताऱ्यात त्यांचा सत्कार केला. त्यांनी दाखवलेल्या या प्रामाणिकपणाबद्दल माजी खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या पत्नी यांनी देखील धनाजी यांचा सत्कार केला. तसेच अनेक आमदार तसेच उद्योजक देखील भेटायला येत आहेत. त्यांना आर्थिक मदत देत आहेत. मात्र, त्यांनी नम्रपणे सर्वांना नकार दिला आहे.

धनाजी जगदाळे यांची आर्थिक परिस्थिती कशी?

धनाजी जगदाळे गावातील प्रामाणिक व्यक्तिमत्त्व आहे. ते एकटेच राहतात. उदरनिर्वाह गावातील लोकांच्या मदतीने होतो. तसेच गावातील आनंद जगदाळे मंडप स्पिकर कंत्राटदार यांच्याकडे काम करतात. तिथेच त्यांची भोजनाची व्यवस्था केली जाते. तसेच ते शेतीतही काम करतात.

'अमेरिके'हून ही जाहीर मदत -

पिंगळी येथील रहिवासी प्राध्यापक राजेंद्र जगदाळे यांनी धनाजी यांच्या प्रामाणिकपणाबद्दल फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली होती. त्यांची पोस्ट पाहिल्यानंतर अमेरिकेतील एका कंपनीत कार्यरत असलेले राहुल बरगे यांनीदेखील धनाजी यांना मदत जाहीर केली. मात्र, ती रक्कमसुद्धा ते स्वीकारणार नसल्याचे प्राध्यापक जगदाळे यांनी सांगितले.

Intro:आजच्या कलियुगात प्रामाणिक पणा खूप कमी प्रमाणात बघायला मिळतो,यातच जर दिवाळीचा सण असेल आणि चक्क हजारो रुपये आपल्याला सापडले तर?
Body:आपण काय केलं असतं? असे अनेक प्रश्न आपल्याला नक्की पडले असतील ,पण माण तालुक्यातील पिंगळी बुद्रुक च्या 54 वर्षीय धनाजी यशवंत जगदाळे हा प्रामाणिक सामान्य नागरिक कष्ट करून आपला उदरनिर्वाह चालवतात दहिवडी येतील आठवडा बाजारातुन बाजारातुन भाजीपाला आणण्यासाठी गेले होते भाजीपाला घेऊन झाल्यावर त्यांचे पैसे संपले अन घरी जाण्यासाठी सुद्धा पैसे राहिले नाहीत त्यांची परिस्थिती अतिशय गरीब आहे. पिंगळी ते दहिवडी जेमतेम 6
किलोमीटर च अंतर, एसटी ला 7 रुपये तिकिट आहे, धनाजी पैसे नसल्याने दहिवडी एसटी बसस्थानकात च झोपला
रात्री झोपेत त्याला जाग आली असता, पायाजवळ तब्बल 40 हजार रुपयांचे बंडल पडलेले त्याला दिसले,त्याने ते पैसे उचलून मोठ्याने कुणाचे पैसे पडलेत का विचारले,
तोपर्यंत टॉयलेट ला गेलेली एक व्यक्ती आली व माझे पैसेआहेत, म्हणाली,पत्नी च्या शस्त्रक्रिये साठी पैसे घेऊन चाललो असल्याचे त्या व्यक्तीने सांगितले, मग धनाजी ने
त्याला नोटांची माहिती विचारली,खात्री पटल्यावर त्याला पैसे परत दिले, ती व्यक्ती बक्षीस म्हणून धनाजी ला 1000 रुपये देत होती, मात्र धनाजी ने फक्त पिंगळी ला परत जाण्याची तिकीट 7 रुपये घेतले,. केवढा हा प्रामाणिक पणा...यावेळी दहिवडी आगारप्रमुख मोनाली पाटील, वाहतूक नियंत्रक सतीश सावंत,शैलेश देशमाने, शिंदे या एसटी अधिकाऱ्यांनी ही धनाजी च कौतुक केलं तर
पिंगळी चे युवा नेते श्रीकांत जगदाळे यांनी धनाजीला पूर्ण पोशाख देवून सत्कार केला, तर आज जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी देखील साताऱ्यात त्यांचा सत्कार केला
अनेक आमदार तसेच उद्योजक देखील भेटायला येत आहेत.
Conclusion:
Last Updated : Nov 4, 2019, 7:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.