ETV Bharat / state

आईला चुकवून पोहायला गेलेल्या भावंडांचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू, मिठी मारलेल्या अवस्थेतच दोघांचेही मृतदेह

साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यातून हृदयद्रावक घटना समोर आली आहे. बंधाऱ्यात पोहायला गेलेल्या सख्ख्या भावंडांचा बुडून मृत्यू झालाय. दोन्ही मुले अनुक्रमे इयत्ता आठवी आणि सहावीत शिकत होती. या घटनेने कोरेगाव तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

drowned in dam heartbreaking incident in Koregaon
सख्ख्या भावंडांचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 5, 2023, 2:08 PM IST

सातारा : दोन सख्ख्या भावंडांचा बंधाऱ्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी सायंकाळी कोरेगाव तालुक्यातील हिवरे गावात घडली आहे. ऋतुराज रोहिदास गुजले (वय १४), वेदांत रोहिदास गुजले (वय १२, रा. हिवरे, ता. कोरेगाव), अशी मृत मुलांची नावं आहेत. रात्री उशीरा दोघांचे मृतदेह सापडले.

रविवारी शाळेला सुट्टी आणि त्यातच किन्हई येथे बैलगाडी शर्यत असल्यानं मुलं शर्यतीकडं जातील, म्हणून आईनं दोन्ही मुलांना जांभळा शिवारातील शेतात नेलं होतं. परंतु, बहुतांश ग्रामस्थ हे शर्यतीला गेल्यामुळं शिवारात फारसे लोक नव्हते. त्या परिसरात जलसंधारणातून बंधारे बांधण्यात आले आहेत. दुपारच्यावेळी ऋतुराज आणि वेदांत तेथील बंधाऱ्यात पोहत होते. त्यानंतर दोन्ही भावंडे आईबरोबर घरी गेली होती.

पुन्हा पोहायला गेली अन् बुडाली : आईचा डोळा चुकवून दोन्ही भावंडे पुन्हा पोहायला गेली. सायंकाळ झाली तरी दोन्ही मुले कुठे दिसेनात म्हणून मुलांची शोधाशोध सुरू झाली. मात्र, ती सापडत नव्हती. ग्रामस्थांनी नाईक इनाम नावाच्या शिवारापासून दोनशे फूटावर असलेल्या बंधाऱ्याकडे धाव घेतली. तेव्हा त्यांना बंधाऱ्याच्या काठावर दोन्ही मुलांची कपडे दिसली. काही तरूणांनी बंधाऱ्यात उड्या मारून मुलांचा शोध घेतला. रात्री उशीरा ऋतुराज आणि वेदांत या दोघांचेही मृतदेह सापडले. या घटनेमुळं कोरेगाव तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

मिठी मारलेल्या अवस्थेत सापडले मृतदेह : ऋतुराज याला चांगले पोहता येत होते. मात्र, वेदांतला पोहता येत नव्हते. एकमेकांना मिठी मारलेल्या अवस्थेतच दोघांचेही मृतदेह सापडले. यावेळी आई-वडील आणि नातेवाईकांनी केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. उपस्थितांनाही अश्रू अनावर झाले. मुलांचे वडिल रोहिदास गुजले हे ट्रॅक्टर चालक असून त्यांना दोनच मुले होती. याप्रकरणी निलेश महादेव गुजले यांनी वाठार स्टेशन पोलिस ठाण्यात खबर दिली असून अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. या प्रकरणाचा हवालदार जाधव तपास करत आहेत.

हेही वाचा :

  1. गोदामात मक्याच्या पोत्यांखाली 10 हून अधिक कामगार अडकले, 3 जणांचा मृतदेह
  2. मराठा आरक्षणाबाबत उद्या सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी, मराठा बांधवांना मिळणार का दिलासा?
  3. राज्यात 75 ठिकाणी उभारणार नाट्यगृह, 386 कोटी रुपये देण्यात येणार- सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.