ETV Bharat / state

कोरोना पार्श्वभूमीवर सभेत पोलीस पाटलाला सरपंच पुत्राची मारहाण

सरपंच पुत्राने गावचे पोलीस पाटील अवधूत जगदाळे यांना आणि त्यांच्या वडिलांना गंभीर मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. गावात दहशत माजवत सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्यांच्यावर दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

author img

By

Published : May 3, 2020, 9:40 PM IST

कोरोना
कोरोना

सातारा - बोथे (ता. माण) या गावात फिरून भाजीपाला विक्री का करत आहात? अशी विचारणा पोलीस-पाटील यांनी केली, म्हणून याचा राग मनात धरून बोथेच्या सरपंच पुत्राने गावचे पोलीस पाटील अवधूत जगदाळे यांना आणि त्यांच्या वडिलांना गंभीर मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. गावात दहशत माजवत सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्यांच्यावर दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन गंभीर असून प्रत्येक गावात दक्षता समिती स्थापन करण्यात आली असून त्यानुसार गावात पोलीस पाटील, सरपंच, ग्रामसेवक यांच्यावर फार मोठी जबाबदारी आहे. त्यानुसारच माण तालुक्यातील बोथे या गावात ही अंमलबजावणी सुरू आहे. गावात अनोळखी, निनावी कोणाला येऊ द्यायचे नाही, असे ठरवण्यात आले आहे. बोथे गावच्या सरपंच खाशीबाई जाधव यांचा मुलगा संजय जाधव याने गावातील पोलीस पाटील अवधूत जगदाळे यांना फोन करून ग्रामपंचायतमध्ये बोलावून घेत महत्त्वाच्या विषयी चर्चा करायची आहे, असा फोनवरून निरोप दिला. महत्त्वाचा विषय असल्याने पोलीस पाटील अवधूत जगदाळे हे त्यांचे वडील विलास जगदाळे यांना घेऊन ग्रामपंचायतीमध्ये आले. त्यावेळी तिथे सरपंच खाशीबाई जाधव, त्यांचा मुलगा संजय जाधव, रमेश यादव बाळासाहेब नलवडे, कुंडलिक जगदाळे यांच्यासह काही नागरिक उभे होते. पोलीस पाटील गेल्यावर गावात काही निर्णय घ्यायचे असून पुणे, मुंबईमधून येणाऱ्या नागरिकांना त्याचबरोबर गावातील अन गावच्या परिसरात असणाऱ्या लोकांना फिरून भाजीपाला विक्री करू द्यायची नाही, असा निर्णय आम्ही घेतला आहे, असे संजय जाधव यांनी सांगितले.

यावर पोलीस पाटील म्हणाले, तुमचे बंधू शेजारच्या गावातील लोकांना घेऊन भाजीपाला विकत आहेत. त्यांनाही आपण ताकीद द्यावी, ते का विकत आहेत याबाबत संजय जाधव यांनी त्यांचे बंधू अर्जुन जाधव यांना विचारणा केली असता या गोष्टीचा राग मनात धरून सरपंच पुत्र अर्जुन भीमराव जाधव याने सर्व लोकांच्या समोर मी माझे कर्तव्य बजावत असताना पोलीस पाटील अवधूत जगदाळे यांच्या कानाखाली मारली व लाथा बुक्यांनी मारहाण करायला सुरुवात केली. मग त्यांचे वडील भांडण सोडवण्यासाठी मधे आले असता त्यांनाही त्याने मारहाण केली व त्यांनतर त्यांची आई सरपंच खाशीबाई जाधव यांनी मनात राग धरत जमावबंदीचा आदेश असतानाही गावातील काही महिला अन पुरुष एकत्र करत माझ्या रानातील घरी जाऊन माझी आई चित्रलेखा जगदाळे व पत्नी हिला शिव्या देत तुझ्या मुलाला आज संध्याकाळी ठेवत नाही. त्याला मारून टाकणार असल्याची धमकी दिली. याबाबत दहिवडी पोलीस ठाण्यात दोघांच्या नावे तक्रार दिली आहे.

दरम्यान, पोलीस पाटील यांना मारहाण झाल्याने माण खटाव तालुक्यातील पोलीस पाटील संघटना एकत्र येत ते अवधूत जगदाळे यांच्या पाठीशी उभा राहत संशयित आरोपींपैकी सरपंच खाशीबाई जगदाळे यांना सरपंच पदावरून त्वरित मुक्त करावे, अशी मागणी केली आहे.

माण-खटावमधील सर्व पोलीस पाटील कोरोना आजाराच्या बाबत गावागावात चांगले काम करत असताना असे लोक त्रास देत असतील तर कामे कशी करायची. त्यामुळे यांना कडक शिक्षा करावी, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे, असे पोलीस पाटील संघटनेचे जिल्हा सरचिटणीस महेश शिंदे म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.