सातारा - जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ दिसत असून गेल्या २४ तासांत जिल्ह्यात ९२५ नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली ( Satara Corona Update ) असून एकाचा मृत्यू झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या २ हजार २१२ वर पोहोचली ( Active Corona Cases in Satara ) आहे.
पाॅझिटिव्हिटी दर १८.०६ - जिल्हा आरोग्य यंत्रणेने याबाबतची आकडेवारी प्रसिद्धीस दिली आहे. जिल्ह्यात बाधितांचा वाढता दर लक्षात घेऊन चाचण्या वाढवल्या आहेत. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात एकूण ५ हजार १२२ नमूने घेण्यात आले. ३१४ रुग्णांना उपचार पूर्ण झाल्याने घरी सोडण्यात आले. तर २ हजार २१२ रुग्ण विविध ठिकाणी उपचार घेत आहेत. जिल्ह्याचा पाॅझिटिव्हिटी दर १८.०६ पर्यंत वाढला आहे.
सातारा तालुक्यात चिंता - आज आलेल्या बाधितांमध्ये सर्वाधिक २७५ इतके रुग्ण सातारा तालुक्यातील रुग्ण आहेत. त्या खालोखाल कराड तालुक्यात १७४, कोरेगाव तालुक्यात ८५ व फलटण तालुक्यात ८० कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.
आठ दिवसांत लक्षणीय वाढ - जिल्ह्यात तिसऱ्या लाटेची लक्षणे दिसत असून आज आलेल्या सविस्तर अहवालात तब्बल ९२५ रूग्ण बाधित आढळले आहेत. ही मागील पाच महिन्यातील सर्वात मोठी संख्या आहे. पॉझिटिव्हीटी दरही १८ च्या पुढे गेला आहे.
- जिल्ह्यात आजअखेर
- नमुने - २४ लाख १८ हजार १६२
- कोरोनाग्रस्त -२ लाख ५६ हजार ३२१
- मृत्यू - ६ हजार ५०५
- कोरोनामुक्त - २ लाख ४५ हजार ९०५
हेही वाचा - Yatra of Goddess Kaleshwari : काळेश्वरी देवीची यात्रा रद्द; परिसरात जमाव बंदी लागू