सातारा - स्वातंत्र्यदिनी जिलेबीच्या कारणास्तव नागरिक एकत्र येऊन मोठ्या प्रमाणावर कोरोना विषाणूचा संसर्ग वाढण्याचा धोका आहे. ही शक्यता लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून या दिवशी मिठाई दुकान अथवा जिलेबी उत्पादन आणि विक्रीस जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी मनाई केली आहे. जिलेबीचे पिठ आधी भिजत घालावे लागते. आता ते ओतून द्यायचे काय? असा सवाल मिठाई व्यावसायिकांनी केला आहे.
साताऱ्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मिठाई आणि जिलेबी विक्रीस मनाई केली आहे. साताऱ्यातील मिठाई दुकानदार आणि जिलेबी विक्रेत्यांना पोलिसांची तशा सुचना दिल्या आहेत. जिल्ह्यात कोणत्याही सार्वजनिक तसेच घरगुती ठिकाणी जिलेबी, मिठाई आदी पदार्थांचे उत्पादन तसेच विक्री आणि वाटप करण्यास दिनांक 15 ऑगस्ट रोजी आहे.
हेही वाचा - बेळगाव शिवाजी महाराज पुतळा प्रकरण : ग्रामस्थांच्या 'या' निर्णयाने वादावर पडदा
जिल्हा प्रशासनाने हा निर्णय अचानक कसा घेतला, आता आम्ही जिलेबी करण्यासाठी भिजवलेल्या पिठाचे करायचे काय? असा सवाल साताऱ्यातील प्रसिद्ध मिठाई विक्रेते भरतशेठ राऊत यांनी केला आहे. एका अंदाजानुसार सातारा जिल्ह्यात स्वातंत्र्य दिवस आणि गणतंत्रदिनी काही टन जिलेबीची खरेदी-विक्री होते. त्यासाठी हजारो किलो मैदा भिजत घातला जातो. याबदद्ल बोलताना मिठाई विक्रेते राऊत म्हणाले की, या निर्णयामुळे हजारो लोकांच्या पोटावर पाय आला आहे. जिलेबी बनवण्याची एक प्रक्रिया असते. दहा ते अकरा दिवस आधी सुरु होते. लोकांनी पिठे लावली आहेत, कामगारांना अॅडव्हान्स दिला. खरेदी करुन ठेवलेल्या मैद्याचे मोठे नुकसान होईल.
लाॅकडाऊनमध्ये आधीच नुकसान झालेल्या विक्रेत्यांना अधिक नुकसान सोसणारे नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या निर्णयाचा पुनश्च विचारावा, अशी विनंतीही भरतशेठ राऊत यांनी ईटीव्ही भारतसोबत बोलताना केली.