ETV Bharat / state

कोरोना रुग्णांच्या वारेमाप बिलांना चाप... प्रशासनाने परत मिळवून दिली अधिकच्या बिलातील 34 लाखांची रक्कम

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता सातारा जिल्हा प्रशासनाने विविध खासगी रुग्णालये कोरोना आजारावर उपचार करण्यासाठी अधिगृहित केली होती. मात्र कोरोना रुग्णांकडून अधिकचे बिल उकळून त्यांना लूटणाऱ्या रुग्णालयांना जिल्हा प्रशासनाच्या पथकाने चाप लावला आहे व १२२ रुग्णांकडून उकळलेली जवळपास ३४ लाखांंची अधिकच्या बिलाची रक्कम त्यांना परत मिळवून दिली.

Refunds paid to patients
कोरोना रुग्णांच्या वारेमाप बिलांना चाप
author img

By

Published : Sep 22, 2020, 9:06 PM IST

सातारा - कोरोना रुग्णांना वारेमाप बिल आकारणी करुन लुटणाऱ्या हाॅस्पिटलला चाप बसवत जिल्हा प्रशासनाच्या पथकाने 122 रुग्णांना आकारण्यात आलेली 33 लाख 94 हजार 856 रुपये जास्तीची रक्कम त्यांना परत मिळवून दिली.

केलेल्या उपचारांच्या बिलांबाबत जिल्हा प्रशासनाकडे अनेक तक्रारी येत होत्या. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आदेश काढून एक पथक नेमले होते. या पथकाने 1 हजार 112 कोरोना बाधितांवरील उपचारांची बिले तपासली. त्यामध्ये 122 जणांची बिले अवाजवी आकारण्यात आल्याचे निदर्शनास आले. या 122 रुग्णांकडून 33 लाख 94 हजार 856 रुपये जास्तीचे आकारण्यात आली होती. ही रक्कम त्यांना परत करण्यात आली.

कोरोना (कोविड- १९) बाधित रुग्णांना रुग्णालयांकडून वाजवीपेक्षा जास्त बील घेतले आहे, अशी तक्रार असलेल्या रुग्णांच्या बिलांची तपासणी करण्यासाठी तपासणी पथकाद्वारे नोडल अधिकाऱ्याची नेमणूक जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केली आहे. जिल्ह्यातील विविध खासगी रुग्णालयांनी उपचार घेऊन घरी गेलेल्या 122 कोरोनाबाधित रुग्णांकडून 96 लाख 10 हजार 770 रुपये आकारण्यात आले होते. या पथकाने 122 केसेसमध्ये तब्बल 33 लाख 94 हजार 856 इतकी रक्कम कमी करुन ही रक्कम परत करण्याचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले.

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्हा प्रशासनाने विविध खासगी रुग्णालये कोरोना आजारावर उपचार करण्यासाठी अधिगृहित केली होती. परंतु या रुग्णालयांकडून रुग्णांना देण्यात येणारे देयक हे शासनाने निर्धारित केलेल्या दराप्रमाणे देण्यात येते, की नाही याची तपासणी हे पथक करते. प्रत्येक पथकात एक नोडल अधिकारी व एका ऑडिटरची नेमणूक आहे. जिल्हाधिकारी यांनी नेमणूक केलेल्या पथकाकडून रुग्णालयनिहाय बिलांची तपासणी करण्यात आली. तपासणी केल्यानंतर 33 लाख 94 हजार 856 रुपये इतके देयक कमी करुन 62 लाख 73 हजार 554 रुपये इतकेच उपचाराचे देयक देय करण्यात आलेले आहे. यापुढेही रुग्णालयांच्या तपासणीसाठी तयार करण्यात आलेल्या पथकांकडून कोरोनाबाधितांवर केलेल्या उपचारांच्या देयकांची तपासणी वेळोवेळी करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी स्पष्ट केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.