ETV Bharat / state

साताऱ्यात राजे विरुद्ध राजे संघर्ष पेटला, उदयनराजेंवर टीका करताना रामराजेंची जीभ घसरली

author img

By

Published : Jun 14, 2019, 7:53 PM IST

खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर टीका करताना विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांची जीभ घसरली आहे. साताऱ्यातील ३ कुत्री पिसाळलेली आहेत, त्यांना आवरा अन्यथा आपणही पिसाळलेले राजकारण करु असा इशारा रामराजेंनी दिला आहे.

साताऱ्यात राजे विरुद्ध राजे संघर्ष पेटला

सातारा - खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर टीका करताना विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांची जीभ घसरली आहे. साताऱ्यातील ३ कुत्री पिसाळलेली आहेत, त्यांना आवरा अन्यथा आपणही पिसाळलेले राजकारण करु असा इशारा रामराजेंनी दिला आहे. नीरा देवघर पाण्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी रामराजे यांच्यावर नाव न घेता टीका केली होती. त्याला उत्तर देताना आज रामराजेंची जीभ घसरली.

उदयनराजेंवर टीका करताना रामराजेंची जीभ घसरली

रामराजेंच्या या वक्तव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. नीरा देवघर पाण्यावरुन आता साताऱ्याचे राजकारण चांगलेच तापल्याचे चित्र सध्या दिसत आहे. उदयनराजेंनी केलेल्या टीकेला उत्तर देताना रामराजेंनी साताऱ्यात ३ पिसाळलेली कुत्री आहेत, असे म्हणत खासदार उदयनराजे भोसले, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे यांच्यावर टीका केली.

काय म्हणाले होते उदयनराजे

दुष्काळी भागाला पाणी देण्याचे आदेश १४ वर्षांपूर्वी का काढले नाहीत? असा सवाल करत उदयनराजे भोसलेंनी रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर टीका केली होती. त्यावर आज बोलताना रामराजे नाईक निंबाळकर यांनी खालच्या पातळीवर जाऊन टीका केली.

Intro:सातारा: नीरा देवघर पाण्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी रामराजे यांच्यावर नाव न घेता टीका केली होती. तर आज उदयनराजे यांना उत्तर देताना रामराजे यांची जीभ घसरली आहे. त्यांनी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे यांच्यावर ती खालच्या पातळीवर जाऊन टीका केले आहे.

Body:साताऱ्यात झालेल्या पत्रकार परिषदेत रामराजे यांनी साताऱ्यातील पिसाळलेली तीन कुत्री आहेत. ती जागेवर येईपर्यंत आपणही पिसाळलेले राजकारण करू असा इशारा देत रामराजे नाईक निंबाळकर यांनी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार जयकुमार गोरे यांची तुलना कुत्र्यांशी केली आहे. तरी रामराजे यांच्या विधानामुळे नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान यावेळी बोलताना रामराजे यांनी शरद पवारांनी उदयनराजेंना आवरा अन्यथा आपण पक्षातून बाहेर पडू असा इशारा दिला आहे. तसेच लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसचे माण-खटाव चे आमदार जयकुमार गोरे हे मूळ पदावर येतील त्यासाठी उदयनराजेंना आवारा असा टोलाही त्यांनी या पत्रकार परिषदेत लगावला आहे.

दुष्काळी भागाला पाणी देण्याचे आदेश 14 वर्षांपूर्वी का काढला नाही. असा सवाल करत उदयनराजे भोसले यांनी रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर टीका केली होती. त्यावर ती आज बोलताना रामराजे नाईक निंबाळकर यांनी खालच्या पातळीवर जाऊन टीका केली आहे.

व्हिडिओ सेंड whtasapp

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.