सातारा- गेल्या दोन दिवसांपासून पाणलोट क्षेत्रातील कोयनानगर ( Rains lashed in Koynanagar ) , नवजा आणि महाबळेश्वरमध्ये पावसाने पूर्णत: दडी मारली आहे. त्यामुळे कोयना धरणातील पाणीसाठ्यात घट झाली ( shortage of water in Koyna Dam ) आहे. कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातून 2100 क्युसेस पाण्याचा नदीपात्रात विसर्ग सुरू आहे. तर धरणात आता केवळ 16 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे.
कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील पावसाच्या आगमनाने मिळालेला आनंद दोन दिवसातच मावळला ( Koyna Dam catchment area ) आहे. गेल्या दोन दिवसांपासून पाणलोट क्षेत्रातील कोयनानगर, नवजा आणि महाबळेश्वरमध्ये पावसाने पूर्णत: दडी मारली आहे. त्यामुळे कोयना धरणातील पाणीसाठ्यात घट झाली ( power house of Koyna Dam ) आहे. कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातून 2100 क्युसेस पाण्याचा नदीपात्रात विसर्ग सुरू असल्याने धरणात आता केवळ 16 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे.
पाऊस लांबल्याने चिंता वाढली- मान्सूनचे दणक्यात आगमन आणि मान्सून महाराष्ट्र व्यापणार, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. त्यानंतर दोन दिवस कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाला सुरूवात देखील झाली होती. परंतु, मागील दोन दिवसात पावसाने पुर्णत: उघडीप दिली आहे. कोयना, नवजा आणि महाबळेश्वरमध्ये पावसाचा थेंबही पडलेला नाही. यामुळे कोयना धरणातील पाणीसाठ्यावर परिणाम झाला आहे. पावसाने दडी मारल्याने चिंता वाढली आहे.
कोयना धरणातील पाणीसाठ्यात घट-कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातून नदीपात्रात 2100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मात्र, पाणलोट क्षेत्रात पाऊस थांबल्यामुळे पाणीसाठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. गेली दोन दिवस पावसाने पुर्णत: उघडीप दिली आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा 16 टीएमसीवर आला आहे. 1 जून या तांत्रिक वर्षाला सुरूवात झाल्यापासून गुरूवारपर्यंतच्या पंधरा दिवसांत कोयनानगर आणि नवजा येथे 35 मिलीमीटर, तर महाबळेश्वरमध्ये 30 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
हेही वाचा-Amravati Rain : अमरावतीत जोरदार वादळासह पाऊस; वाऱ्याने मॉलच्या काचा कोसळल्या