ETV Bharat / state

Pune Woman Tourist Died: फिरायला गेलेल्या नवविवाहितेचा सेल्फी घेताना सुटला तोल, महाबळेश्वरच्या केटस् पॉईंटवरून कोसळून मृत्यू - महिला सेल्फी केट्स पाँईट

महाबळेश्वरच्या केटस् पॉइंटवरून सेल्फी घेणे पुण्यातील पर्यटक महिलेच्या जीवावर बेतले आहे. सेल्फी घेताना तोल जाऊन तीनशे फूट खोल दरीत पडल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना मंगळवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली. अंकिता सुनील शिरसकर (वय२३), असे मृत्यू झालेल्या महिला पर्यटकाचे नाव आहे.

Pune Woman Tourist Died
Pune Woman Tourist Died
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 11, 2023, 8:11 AM IST

Updated : Oct 11, 2023, 8:46 AM IST

सातारा: सेल्फी काढताना नेहमी काळजी घेण्याचा पर्यटकांना सल्ला दिला जातो. या सल्ल्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे महिलेचा मृत्यू झाला. महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्वरमधील केट्स पाँईंटवरून सेल्फी घेताना पर्यटक महिला दरीत कोसळली. या घटनेत महिलेचा मृत्यू झाला. अंकिता सुनिल शिरसकर (वय २३), असे तिचं नाव आहे. महाबळेश्वर आणि सह्याद्री ट्रेकर्सच्या टीमने रात्री महिलेचा मृतदेह दरीतून वर काढला.

रेल्वेमध्ये लोको पायलट (चालक) असलेले सुनील ज्ञानदेव शिरस्कर (वय ३०, रा. उंबरेगव्हाण, ता. जि. धाराशिव, सध्या रा. धनकवडी, पुणे) आणि पत्नी अंकिता हे पर्यटक दाम्पत्य दोन दिवसांसाठी दुचाकीवरून महाबळेश्वर पर्यटनासाठी गेले. मात्र, हे आनंदाचे क्षण शिरस्कर कुटुंबासाठी दु:खाचे क्षण ठरले.

सेल्फी घेणे जीवावर बेतले - महाबळेश्वरला पर्यटनासाठी आल्यानंतर केटस् पॉईंटवरून सेल्फी घेणे विवाहित महिलेच्या जीवावर बेतलं. सेल्फी घेताना तोल जाऊन तीनशे फूट खोल दरीत पडल्यानं महिलेचा जागीच मृत्यू झाला. अंकिता शिरसकर ही विवाहिता पतीसोबत पुण्याहून महाबळेश्वरला दुचाकीवरून पर्यटनाला आली होती. या घटनेची माहिती मिळताच महाबळेश्वर आणि सह्याद्री ट्रेकर्सची टीम घटनास्थळी पोहोचली.

  • ट्रेकर्सनी मृतदेह दरीतून वर काढला- महाबळेश्वर आणि सह्याद्री ट्रेकर्सच्या टीमने तातडीनं बचाव कार्यास सुरुवात केली. दरीत उतरून शोध घेतला असता ३०० फूट खोल दरीत पर्यटक महिलेचा मृतदेह आढळून आला. ट्रेकर्सनी तिचा मृतदेह दरीतच पॅक करून रात्री साडेसातच्या सुमारास वर आणला. मृत पर्यटक महिला ही नवविवाहित होती.

या ठिकाणी काढू नये सेल्फी- सेल्फी घेताना धोक्याच्या ठिकाणी सेल्फी घेण्याचा अट्टाहास करू नये. अति उंच ठिकाणी, चालत्या रेल्वेत दरवाज्याच्या कडेला, समुद्रात, नदीच्या प्रवाहात अशा धोक्याच्या ठिकाणी सेल्फी घेऊ नये, असा तज्ज्ञांकडून सल्ला दिला जातो. कारण, सेल्फी काढत असताना लक्ष हे कॅमेरावर केंद्रित झाल्यानं प्राण जाण्याची अधिक शक्यता असते.

हेही वाचा-

  1. Youth Fall In Kund While Taking Selfie: सेल्फी घेताना तरुण 70 फूट कुंडात कोसळला, बचाव कार्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल
  2. ICC Cricket World Cup : ताजमहालात पोहोचली वर्ल्डकप ट्रॉफी; सेल्फी काढण्यासाठी चाहत्यांची गर्दी, Watch Video

Last Updated : Oct 11, 2023, 8:46 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.