ETV Bharat / state

पुणे पदवीधर निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण मतदानापासून वंचित; सदोष यादीचा फटका

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कराडमधील निवासस्थानापासून हाकेच्या अंतरावर मतदान केंद्र होते. परंतु, मतदार यादीत त्यांचे नाव न आल्याने त्यांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही.

author img

By

Published : Dec 1, 2020, 6:53 PM IST

Updated : Dec 1, 2020, 8:13 PM IST

पृथ्वीराज चव्हाण
पृथ्वीराज चव्हाण

कराड (सातारा) - पुणे पदवीधर मतदार संघातील सदोष मतदार यादीमुळे अनेक मतदारांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनाही सदोष मतदार यादीचा फटका बसला. नोंदणी करूनही त्यांचे नाव पदवीधर मतदार संघाच्या यादीत आले नाही. त्यामुळे त्यांना मतदानापासून हक्कापासून वंचित रहावे लागले.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कराडमधील निवासस्थानापासून हाकेच्या अंतरावर मतदान केंद्र होते. परंतु, मतदार यादीत त्यांचे नाव न आल्याने त्यांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही. पृथ्वीराज चव्हाण हे आज दुपारी ते कराडमधून निघाले. उंब्रज, सातारा, लोणंद येथील मतदान केंद्रांना भेटी देऊन पुणेमार्गे ते मुंबईला गेले.
उमेदवारांनी मतदारांच्या मोबाईलवर मेसेज पाठवून मतदार क्रमांक आणि मतदान केंद्र क्रमांकाची लिंक पाठवली होती. ज्यांना मेसेज गेले नाहीत त्यांच्यामध्ये संभ्रमाचे वातावरण होते. तरीही अनेक पदवीधर मतदार मतदान केंद्रावर आले. परंतु, मतदार यादीत नाव नसल्याने त्यांना मतदानापासून वंचित रहावे लागले. काही मतरादांच्या पत्नीचे नाव होते, पण त्यांचे नाव होते. तर काही जणांच्या पत्नीचे यादीत नाव नव्हते.

पुणे पदवीधर निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण मतदानापासून वंचित

पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान पार पडले आहे. मात्र, पुणे विभागात पदवीधर मतदारसंघ आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी तयारी पूर्ण सदोष मतदार यादीमुळे अनेक सुशिक्षत मतदार मतदानाचा हक्क बजावू शकले नाहीत.

हेही वाचा-पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीची तयारी पूर्ण

या उमेदवारांमध्ये प्रमुख लढत-

पुणे पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकासाठी 62 तर शिक्षक मतदार संघासाठी 35 उमेदवार रिगणात आहेत. पदवीधर मतदारसंघात भाजपाचे संग्राम देशमुख आणि महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड यांच्यात प्रमुख लढत आहे. तर शिक्षक मतदारसंघामध्ये भाजपाने राज्य शिक्षक परिषदेचे जितेंद्र पवार यांना पाठिंबा दिला आहे. महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे जयंत आसगावकर उभे आहेत.

दरम्यान, पुणे पदवीधर व शिक्षक विधान परिषद महाविकास आघाडीचे पदवीधरचे उमदेवार अरुण लाड व शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार प्रा. जयंत आसगावकर यांचा निवडणूक प्रचार पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

हेही वाचा-पुणे पदवीधर निवडणूक : विविध क्षेत्रात काम करणाऱ्या तब्बल ५७ संस्था व संघटनांचा भाजपाला पाठिंबा

Last Updated : Dec 1, 2020, 8:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.