ETV Bharat / state

कृषि सहाय्यकांना विमा संरक्षण द्या; खासदार श्रीनिवास पाटील यांची मागणी - महाराष्ट्र राज्य कृषि सहाय्यक संघटना

ग्रामीण पातळीवर काम करणार्‍या इतर खात्यातील अधिकारी व कर्मचार्‍यांना विमा कवच जाहीर करण्यात आले आहे. त्याच धर्तीवर शेतकर्‍यांशी थेट संपर्क येणार्‍या कृषि सहाय्यक आणि त्यांच्या कुटुंबियांनाही विमा कवच देण्यात यावे, अशी मागणी खासदार श्रीनिवास पाटील यांनी मुख्यमंत्री आणि कृषिमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे.

खासदार श्रीनिवास पाटील
खासदार श्रीनिवास पाटील
author img

By

Published : May 9, 2021, 4:01 PM IST

कराड (सातारा) - यावर्षीचा खरिप हंगाम लवकरच सुरू होत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन काम करणार्‍या कृषि सहाय्यकांना विमा संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी खासदार श्रीनिवास पाटील यांनी मुख्यमंत्री आणि कृषिमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा सर्वजण सामना करत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारच्या माध्यमातून प्रभावी उपाययोजना केल्या जात आहेत. अशा या संकटाच्या सावटात यावर्षीचा खरीप हंगाम सुरू होत आहे. कृषी विभागातील अधिकारी व कर्मचार्‍यांना गाव पातळीवर काम करताना शेतकर्‍यांच्या बांधावर जावे लागते. खरीप हंगाम यशस्वी करण्याची जबाबदारी कृषी सहाय्यकांवर आहे. कोरोनासारख्या संकटात त्यांना कोणतेही विमा संरक्षण देण्यात आलेले नाही. त्यामुळे अनुचित घटना घडल्यास कृषी सहाय्यक व त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक संरक्षण देण्यात आले नसल्याचे महाराष्ट्र राज्य कृषि सहाय्यक संघटनेने निदर्शनास आणले आहे. संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी यासंदर्भात आपले गार्‍हाणे मांडले असून सरकारने त्यांच्या मागणीचा सकारात्मक विचार करणे आवश्यक आहे.

ग्रामीण पातळीवर काम करणार्‍या इतर खात्यातील अधिकारी व कर्मचार्‍यांना विमा कवच जाहीर करण्यात आले आहे. त्याच धर्तीवर शेतकर्‍यांशी थेट संपर्क येणार्‍या कृषि सहाय्यक आणि त्यांच्या कुटुंबीयांनाही विमा कवच देण्यात यावे, अशी मागणी खासदार श्रीनिवास पाटील यांनी मुख्यमंत्री आणि कृषिमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.