सातारा - जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. काल रात्री उशिरापर्यंत हा आकडा सहा हजारांवर गेला आहे. याच पार्श्वभूमीवर 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात येणार आहे. स्वातंत्र्य दिनी सर्वत्र मिठाईचे, खासकरून जिलेबीचे वाटप केले जाते. या कार्यक्रमाच्या दिवशी जिलेबीच्या कारणास्तव नागरिक एकत्र येऊन मोठ्या प्रमाणावर कोरोना विषाणूचा संसर्ग होऊन सार्वजनिक आरोग्य धोक्यात येऊ शकते. तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन सार्वजनिक शांतता व सुरक्षिततेस बाधा उत्पन्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
यासाठी जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी साताऱ्यात कोणत्याही सार्वजनिक तसेच घरगुती ठिकाणी जिलेबी, मिठाई पदार्थांचे उत्पादन तसेच विक्री व वाटप करण्यास बंदी घातली आहे. 15 ऑगस्टला रात्रीपासून 16 ऑगस्ट पर्यंत क्रिमीनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 नुसार ही बंदी घालण्यात आली आहे.
15 ऑगस्टला मिठाईच्या उत्पादनासह विक्री व वाटप करण्यास मनाई - corona affects independence day
साताऱ्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. काल रात्री उशिरापर्यंत हा आकडा सहा हजारांवर गेला आहे. याच पार्श्वभूमीवर 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात येणार आहे.