सातारा- आज विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाचा दिवस होता. शहरातील नागरिकांसह उमेदवारांनी देखील आपआपल्या मतदान केंद्रवार कुटुंबासह मतदान केले. महाआघाडीकडून आमदार पृथ्वीराज चव्हाण, महायुतीचे उमेदवार डॉ.अतुल भोसले आणि रयत संघटनेचे अपक्ष उमेदवार अॅड. उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी आपल्या कुंटुंबासह मतदानाचा हक्क बजावला.
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड नगर पालिकेतील शाळा क्र. ३ मधील मतदान केंद्रावर मतदान केले. महायुतीचे उमेदवार डॉ.अतुल भोसले यांनी कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुक आणि रयत संघटनेचे अपक्ष उमेदवार अॅड.उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी उंडाळे येथील मतदान केंद्रावर मतदान केले.
पृथ्वीराज चव्हाण यांच्या समवेत त्यांच्या पत्नी सौ. सत्वशिला चव्हाण, पुतणे इंद्रजीत चव्हाण, राहुल चव्हाण आणि कुटुंबीयांनी मतदान केले. महायुतीचे डॉ. अतुल भोसले यांच्यासह त्यांच्या पत्नी सौ. गौरवी भोसले, वडील डॉ. सुरेश भोसले, आई सौ. उत्तरा भोसले, भाऊ विनायक भोसले, चुलते मदनराव मोहिते आणि मोहिते-भोसले कुटुंबातील सदस्यांनी रेठरे बुद्रुकमधील पवार मळा केंद्रावर मतदानाचे हक्क बजावले. तर, रयत संघटनेचे अपक्ष उमेदवार अॅड. उदयसिंह पाटील यांनी उंडाळे येथील शाळेत सपत्निक मतदान केले. तसेच माजी सहकार मंत्री विलासकाका पाटील उंडाळकर यांनीही मतदानाचे हक्क बजावले.
हेही वाचा- परतीचा मुसळधार; कोयना धरणाचे चार दरवाजे १ फुटाने उघडले