कराड (सातारा) - राज्यातील डिसेंबर 2021 ते फेब्रुवारी 2022 अखेर मुदत संपणार्या नगरपालिका, नगरपंचायतींच्या निवडणुकांची पूर्वतयारी राज्य निवडणूक आयोगाने सुरू केली आहे. या निवडणुका एक सदस्यीय प्रभाग पध्दतीने होणार आहेत. निवडणुकांसाठी पालिकांच्या प्रारूप प्रभाग रचनेचा गुगल नकाशाद्वारे कच्चा आराखडा तयार करण्याबाबतचे आदेशही जारी करण्यात आले आहेत. तथापि, निवडणुका कधी होणार हे कोरोनाच्या तिसर्या लाटेवर अवलंबून असेल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
सातार्यातील आठ नगरपालिकांचा कार्यकाळ डिसेंबर अखेर संपणार-
सातारा जिल्ह्यातील सातारा, कराड, फलटण, वाई, म्हसवड, रहिमतपूर, महाबळेश्वर, पाचगणी या आठ नगरपालिकांची मुदत डिसेंबरअखेर संपणार असल्याने त्यांची निवडणूक होणार आहे. कोरोनामुळे गेली दीड वर्ष नगरपालिका व नगरपंचायतींच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या होत्या. नोव्हेंबर 2021 मध्ये 185 पेक्षा जास्त नगरपालिकांचा कार्यकाल संपणार आहे. कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात येत असतानाच निवडणूक आयोगाने या निवडणुकांच्या पूर्वतयारीला सुरुवात केली आहे. डिसेंबर 2021 मध्ये सातारा, कराड, फलटण, वाई, म्हसवड, रहिमतपूर, महाबळेश्वर, पाचगणी या आठ नगरपालिकांचा कार्यकाळ संपत आहे.
प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा करण्याचे आदेश-
राज्य निवडणूक आयोगाने डिसेंबर 2021 ते फेब्रुवारी 2022 अखेर मुदत संपणार्या नगरपालिका आणि नगरपंचायती तसेच नवनिर्मित नगरपालिकांसह नगरपंचायतींच्या प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश नुकतेच जारी केले आहेत. तसेच मार्च 2020 च्या शासन आदेशानुसार नगरपालिका निवडणुकांसाठी बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीऐवजी एकसदस्यीय प्रभाग पद्धतीने होणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.
निवडणुका कोरोनाच तिसर्या लाटेवर अवलंबून-
या निवडणुका 2011 च्या जनगणनेनुसार होणार आहेत. ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर निकालानुसार प्रभाग रचना प्रसिध्दी व आरक्षण सोडत कार्यक्रमात सूचना देण्यात येणार आहेत. अंतिम प्रभाग वेळेवर व्हावेत, यासाठी कच्चा आराखडा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रत्यक्ष प्रारूप रचनेचा कार्यक्रम नंतर जाहीर होणार आहे. तसेच निवडणुका नक्की कधी होणार, हे कोरोनाच्या तिसर्या लाटेवर अवलंबून असणार आहे.
नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुका होणार एकसदस्यीय प्रभाग पध्दतीने, पूर्वतयारी सुरू - Preparations for Municipal, Nagar Panchayat elections
नगरपालिका, नगरपंचायतींच्या निवडणुकांची पूर्वतयारी राज्य निवडणूक आयोगाने सुरू केली आहे. या निवडणुका एक सदस्यीय प्रभाग पध्दतीने होणार आहेत. निवडणुका कधी होणार हे कोरोनाच्या तिसर्या लाटेवर अवलंबून असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.