ETV Bharat / state

आली लहर केला लॉकडाऊन; विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांची पालकमंत्र्यांवर टीका

प्रविण दरेकर म्हणाले, की लॉकडाऊन योग्य नाही. हा निर्णय घेण्यापूर्वी सर्व आमदारांशी चर्चा करणे आवश्यक होती. जी भीषण परिस्थिती राज्यात आहे तीच सातारा जिल्ह्यात आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 40 टक्के मनुष्यबळाचा अभाव आहे. एकिकडे राज्यशासन 200 ते 500 खाटांची व्यवस्था करत आहे. सुसज्ज रुग्णालय उभारते. परंतु, त्याठिकाणी फिजिशियनच नाही. 10 ते 12 डॉक्टर्स आणि 50 टक्के नर्सिंग स्टाफची कमतरता आहे.

pravin darekar on satara corona situation
आली लहर केला लॉकडाऊन
author img

By

Published : Jul 16, 2020, 7:20 AM IST

Updated : Jul 16, 2020, 7:30 AM IST

सातारा - टेस्टिंग कमी केले तर रुग्णही कमीच दिसणार. सातार्‍यात धोक्याची घंटा वाजत आहे. मृत्यू लपवले जात आहेत. लहर आली म्हणून लॉकडाऊन करायचा हे योग्य नाही. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या संदर्भात राज्य सरकार गंभीर नाही. तीच निष्क्रियता साताऱ्याच्या पालकमंत्र्यांत जाणवत आहे, अशी परखड टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली.

विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांची पालकमंत्र्यांवर टीका

प्रविण दरेकर म्हणाले, की लॉकडाऊन योग्य नाही. हा निर्णय घेण्यापूर्वी सर्व आमदारांशी चर्चा करणे आवश्यक होती. जी भीषण परिस्थिती राज्यात आहे तीच सातारा जिल्ह्यात आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 40 टक्के मनुष्यबळाचा अभाव आहे. एकिकडे राज्यशासन 200 ते 500 खाटांची व्यवस्था करत आहे. सुसज्ज रुग्णालय उभारते. परंतु, त्याठिकाणी फिजिशियनच नाही. 10 ते 12 डॉक्टर्स आणि 50 टक्के नर्सिंग स्टाफची कमतरता आहे. जिल्हाधिकार्‍यांना विचारणा केली असता राज्य सरकारकडे पाठपुरावा करत असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु, सरकारकडे गांभिर्यच नाही.

सातारा जिल्ह्यातील परिस्थितीबाबत मी उद्या मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांशीही बोलणार आहे. शिरवळ येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये स्वच्छतागृहात दुर्गंधीचे साम्राज्य आहे. वेळेवर पाणी, दूध, नाश्ता मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. लॉकडाऊन करताना लोकप्रतिनिधी आणि स्वयंसेवी संस्थांना कोणीच विचारात घेत नाही. जेवढे लोक करोनामुळे त्रस्त झाले आहेत तेवढेच उपासमारीने मरतील. त्यामुळे लॉकडाऊन करताना बॅलन्स साधला पाहिजे. प्रशासन सर्वच ठिकाणी एककल्ली वागत आहे, असा आरोपही त्यांनी केला.

राज्य सरकारामध्ये इच्छाशक्तीचा अभाव आहे. तीच वृत्ती झिरपत खाली असल्याने साताऱ्याच्या पालकमंत्र्यांमध्ये इच्छाशक्ती दिसत नाही. सातारा जिल्हा रुग्णालयात अवघे 6 व्हेंटिलेटर आहेत. हे ऐकल्यावरच इथल्या परिस्थितीची कल्पना येते. आणखी 12 व्हेंटिलेटरची व्यवस्था दोन दिवसात करतोय, अशी ग्वाही दरेकर यांनी दिली.

माजी मुख्यमंत्र्यांसाठी नामुष्की

कोरोना तपासणीची लॅब मान्यतेच्या प्रक्रियेत आहे. अनुमानितांचे स्वॅब पुण्याला जाणार. त्याचे रिपोर्ट तीन दिवसांच्या आत येत नाहीत. तोपर्यंत रुग्ण आणि त्याचे नातेवाईक तणावात राहतात. माजी मुख्यमंत्र्यांचे गाव असलेल्या कराडमध्ये उप उपजिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटरची मान्यता काढून घेण्यात येते. यासारखी नामुष्की नाही, असा टोलाही विरोधीपक्ष नेत्यांनी लावला.

Last Updated : Jul 16, 2020, 7:30 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.