ETV Bharat / state

राष्ट्रवादीचे प्रणव ताटे होणार कराड पंचायत समितीचे सभापती? - Karad latest news

कराड पंचायत समितीत काँग्रेसचे माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर आणि राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटील यांच्या गटांची युती आहे. दोन्ही गटांनी पंचायत समितीत सत्ता स्थापन केली होती.

Pranav Tate
प्रणव ताटे
author img

By

Published : Dec 12, 2019, 6:48 AM IST

सातारा - पंचायत समितीच्या सभापतिपदासाठीची आरक्षण सोडत बुधवारी जाहीर झाली. त्यामध्ये कराड पंचायत समिती सभापतीपद अनुसुचीत जाती प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य प्रणव ताटे यांना सभापतिपद मिळण्याची शक्यता आहे. उत्साही आणि सभागृहात विविध विषयांवर सातत्याने नागरीकांच्या समस्या मांडणारे सदस्य म्हणून ते परिचित आहेत.

कराड पंचायत समितीत काँग्रेसचे माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर आणि राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटील यांच्या गटांची युती आहे. दोन्ही गटांनी पंचायत समितीत सत्ता स्थापन केली होती. पहिल्या सव्वा वर्षासाठी राष्ट्रवादीच्या शालन माळी यांना सभापतिपदी संधी मिळाली. त्यानंतर उंडाळकर गटाच्या फरिदा इनामदार या सभापती झाल्या. आता पुढील अडीच वर्षासाठी सभापतीपद अनुसुचीत जाती प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे.

हेही वाचा - साताऱ्यातील 'त्या' काळरात्रीला आज 52 वर्षे पूर्ण

त्यामुळे उंडाळकर-पाटील गटातील युतीच्या फॉर्म्युल्यानुसार शेवटच्या अडीच वर्षातील पहिल्या सव्वा वर्षासाठी सभापतीपद आमदार बाळासाहेब पाटील यांच्या गटाकडे जाणार आहे. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे पंचायत समिती सदस्य प्रणव ताटे हे सभापतिपदाचे दावेदार असून सभापती पदाची माळ त्यांच्याच गळ्यात पडण्याची दाट शक्यता आहे.

कराड पंचायत समिती सदस्यांची संख्या 24 आहे. त्यात बाळासाहेब पाटील आणि विलासराव उंडाळकर यांच्या गटाचे प्रत्येकी 7 आणि भाजप प्रणित डॉ. अतुल भोसले गटाचे 6 सदस्य आहेत. पंचायत समितीच्या निवडणुकीनंतर कोणत्याच पक्ष अथवा गटाला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. त्यामुळे समविचारी म्हणून उंडाळकर-पाटील यांच्या गटांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन केली होती.

हेही वाचा - मोक्कातील फरार आरोपी अभिनंदन झेंडेला अटक; 4 दिवस पोलीस कोठडी

दोन्ही गटांची सदस्य संख्या प्रत्येकी 7 अशी समान असल्याने सव्वा-सव्वा वर्षासाठी सभापतिपद घेण्याचा समझोता झाला. पहिल्या अडीच वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर आता पुढील अडीच वर्षासाठीही दोन्ही गटाच्या सदस्यांना सव्वा-सव्वा वर्ष सभापतिपद मिळणार आहे. त्यानुसार राष्ट्रवादीतून अनुसुचित जाती प्रवर्गातील प्रणव ताटे यांचे नाव आघाडीवर आहे.

Intro:पंचायत समितीच्या सभापतिपदासाठीची आरक्षण सोडत बुधवारी जाहीर झाली आहे. त्यामध्ये कराड पंचायत समितीचे सभापतीपद अनुसुचीत जाती प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य प्रणव ताटे यांना सभापतिपदाची संधी आहे.Body:
कराड (सातारा) - पंचायत समितीच्या सभापतिपदासाठीची आरक्षण सोडत बुधवारी जाहीर झाली आहे. त्यामध्ये कराड पंचायत समितीचे सभापतीपद अनुसुचीत जाती प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य प्रणव ताटे यांना सभापतिपदाची संधी आहे. उत्साही आणि सभागृहात विविध विषयांवर सातत्याने नागरीकांच्या समस्या मांडणारे सदस्य म्हणून ते परिचित आहेत. 
   कराड पंचायत समितीत काँग्रेसचे माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर आणि राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटील यांच्या गटांची युती आहे. दोन्ही गटांनी पंचायत समितीत सत्ता स्थापन केली होती. पहिल्या सव्वा वर्षासाठी राष्ट्रवादीच्या शालन माळी यांना सभापतिपदी संधी मिळाली. त्यानंतर उंडाळकर गटाच्या फरिदा इनामदार या सभापती झाल्या. आता पुढील अडीच वर्षासाठी सभापतीपद अनुसुचीत जाती प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. त्यामुळे उंडाळकर-पाटील गटातील युतीच्या फॉर्म्युल्यानुसार शेवटच्या अडीच वर्षातील पहिल्या सव्वा वर्षासाठी सभापतीपद आमदार बाळासाहेब पाटील यांच्या गटाकडे जाणार आहे. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे पंचायत समिती सदस्य प्रणव ताटे हे सभापतिपदाचे दावेदार असून सभापती पदाची माळ त्यांच्याच गळ्यात पडण्याची दाट शक्यता आहे.
   कराड पंचायत समिती सदस्यांची संख्या 24 आहे. त्यात आ. बाळासाहेब पाटील आणि विलासराव उंडाळकर यांच्या गटाचे प्रत्येकी 7 आणि भाजप प्रणित डॉ. अतुल भोसले गटाचे 6 सदस्य आहेत. पंचायत समितीच्या निवडणुकीनंतर कोणत्याच पक्ष अथवा गटाला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. त्यामुळे समविचारी म्हणून उंडाळकर-पाटील यांच्या गटांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन केली होती. दोन्ही गटांची सदस्य संख्या प्रत्येकी 7 अशी समान असल्याने सव्वा-सव्वा वर्षासाठी सभापतिपद घेण्याचा समझोता झाला. पहिल्या अडीच वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर आता पुढील अडीच वर्षासाठीही दोन्ही गटाच्या सदस्यांना सव्वा-सव्वा वर्ष सभापतिपद मिळणार आहे. त्यानुसार राष्ट्रवादीतून अनुसुचित जाती प्रवर्गातील प्रणव ताटे यांचे नाव आघाडीवर आहे. 
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.