ETV Bharat / state

दोन निवडणुकांच्या मतदानामुळे कराडमध्ये रात्री आठपर्यंत सुरू होते मतदान

कराडमध्ये सायंकाळी ६ वाजेपर्यंत जे मतदार मतदान केंद्रांवर पोहोचले, त्या सर्वांचे मतदान घेण्यात आले. मात्र, दोन निवडणुकांसाठी एकत्र मतदान करायचे असल्यामुळे मतदान प्रक्रियेस उशीर होत होता. मतदानाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये मतदारांची गर्दी राहिल्याने, अनेक गावांमध्ये रात्री आठ वाजेपर्यंत मतदान सुरू होते. साताऱ्यात विधानसभा निवडणुकीसाठी सुमारे ६६ टक्के, तर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सुमारे ६४ टक्के मतदान झाले.

Satara Assembly Elections 2019
author img

By

Published : Oct 22, 2019, 7:19 AM IST

सातारा - विधानसभा निवडणुकांसाठी सोमवारी राज्यभरात मतदान पार पडले. साताऱ्यामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी तर, लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडले. या दोन्ही निवडणुकांसाठी मतदान करायचे असल्यामुळे मतदानाची वेळ निघून गेल्यावरही मतदान प्रक्रिया सुरू ठेवण्यात आली होती. कराडमध्ये रात्री आठ वाजेपर्यंत मतदान सुरू होते.

कराडमध्ये सायंकाळी सहा वाजेपर्यंत जे मतदार मतदान केंद्रांवर पोहोचले, त्या सर्वांचे मतदान घेण्यात आले. मात्र, दोन निवडणुकांसाठी एकत्र मतदान करायचे असल्यामुळे मतदान प्रक्रियेस उशीर होत होता. मतदानाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये मतदारांची गर्दी राहिल्याने, अनेक गावांमध्ये रात्री आठ वाजेपर्यंत मतदान सुरु होते. साताऱ्यात विधानसभा निवडणुकीसाठी सुमारे ६६ टक्के, तर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सुमारे ६४ टक्के मतदान झाले.

Satara Assembly Elections 2019
शिंगणवाडी गावात १०७ वर्षांच्या आजीबाईंनी बजावला मतदानाचा हक्क!

कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात बनवडी गावातील एका मतदान केंद्रावर मतदान यंत्रांची जोडणी करण्यास उशीर झाला. त्यामुळे मतदान प्रक्रिया एक तास उशीरा सुरु झाली. एकूणच मतदानास होणाऱ्या विलंबामुळे ठिकठिकाणी वयोवृद्ध व्यक्तींना तसेच दिव्यांगांना ताटकळत थांबावे लागले. शिंगणवाडी गावातील मतदान केंद्रावर १०७ वर्षांच्या खाशीबाई बळवंत शिंगण या आजीबाईंनी या परिस्थितीतही मतदानाचा हक्क बजावला.

हेही वाचा : राज्यात शांततेत आणि सुरळीत पार पडली विधानसभा निवडणूक, सरासरी 60 टक्के मतदानाची नोंद..

Intro:सातारा लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभा निवडणुकीसाठी मतदान करावे लागल्याने मतदान प्रक्रियेला विलंब होत होता. त्यामुळे मतदानाची वेळ संपत आली तरी मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा होत्या. जे मतदार सहापर्यंत मतदान केंद्रांच्या आत होते. त्यांना मतदान करता आले. त्यासाठी रात्री ८ पर्यंत मतदानाची प्रक्रिया अनेक ठिकाणी सुरू होती.Body:कराड (सातारा) - सातारा लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभा निवडणुकीसाठी मतदान करावे लागल्याने मतदान प्रक्रियेला विलंब होत होता. त्यामुळे मतदानाची वेळ संपत आली तरी मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा होत्या. जे मतदार सहापर्यंत मतदान केंद्रांच्या आत होते. त्यांना मतदान करता आले. त्यासाठी रात्री ८ पर्यंत मतदानाची प्रक्रिया अनेक ठिकाणी सुरू होती. मतदानाच्या संथगतीमुळे महिला, वयोवृध्दांना रांगेत ताटकळावे लागले. शेवटच्या टप्यात गर्दी राहिल्याने अनेक गावांमध्ये रात्री उशीरापर्यंत मतदान सुरू होते. 
     कराड उत्तर विधानसभा मतदार संघात बनवडी गावातील एका मतदान केंद्रावर अधिकार्‍यांना मतदान यंत्राची जोडणी नीटपणे करता न आल्याने तेथील मतदान प्रक्रिया एक तास उशीराने सुरू झाली. सकाळी ९ नंतर मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा दिसून आल्या. कराड दक्षिणमधील कार्वे गावात जिल्हा परिषद शाळेतील १८० क्रमांकाच्या मतदान केंद्रावर रात्री ८ पर्यंत मतदान सुरू होते. कराडमधील श्री शिवाजी हायस्कूल आणि विठामाता विद्यालयातही मतदारांच्या रांगा होत्या. सायंकाळी सहा पर्यंत जे मतदार केंद्रावर उपस्थित होते. त्यांच्या मतदानाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता. कराड दक्षिण आणि उत्तर या दोन्ही विधानसभा मतदार संघात तिरंगी लढत असल्याने मतदानात चुरस दिसून आली. विधानसभा आणि लोकसभा पोटनिवडणूक, अशा दोन्ही उमेदवारांना मतदान करायचे असल्याने एका मतदाराला मतदान करण्यासाठी किमान एका मिनिटाचा कालावधी लागत होता. त्यामुळेच मतदानाच्या अंतिम वेळेपर्यंत मतदान प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. शिंगणवाडी गावातील मतदान केंद्रावर १०७ वर्षे वयाच्या खाशीबाई बळवंत शिंगण या आजीबाईंनी मतदानाचा हक्क बजावला. वृद्धांबरोबरच दिव्यांगांनीही मतदान केले.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.