सातारा - कराड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने मलकापूर आणि ओगलेवाडी परिसरात सुरू असलेल्या मटका अड्ड्यांवर छापा मारला. यावेळी पोलिसांनी 4 जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. तसेच ताब्यात घेतलेल्या संशयितांनी मटका बुकींची नावेही पोलिसांना सांगितली आहेत.
हेही वाचा - राष्ट्रवादीचे प्रणव ताटे होणार कराड पंचायत समितीचे सभापती?
संदीप शामराव मोहिते, अनिल तानाजी जावळे, राहूल आप्पासो पाटील, अमीर समीर तांबोळी, अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांनी मटका बुकी उमेर अल्ताफ मुजावर, मोहनकुमार बाळकृष्ण कुर्हाडे यांच्यासाठी मटका घेत असल्याचे पोलिसांना सांगितले आहे.
हेही वाचा - साताऱ्यातील 'त्या' काळरात्रीला आज 52 वर्षे पूर्ण
पोलिसांनी या चार आरोपींवर कारवाई केली आहे. परंतु, ते ज्यांच्यासाठी मटका घेत होते, त्या मटका बुकींवर कारवाई होणार का? हा प्रश्न आहे. कारण, अनेक वर्षापासून अवैध व्यावसायिक आणि कराड पोलिसांचे मधुर संबंध आहेत. अवैध व्यावसायिकांकडून पोलिसांना मोठा मलिदा मिळतो, अशी कराडात चर्चा आहे. आता वर्षाअखेर आल्यामुळे पोलिसांकडून मटक्याच्या जुगार अड्ड्यावर कारवाईचा दिखावा केला जात असल्याचे म्हटले जात आहे.