ETV Bharat / state

Satara Crime News : साताऱ्यात बालिकेचे अपहरण करुन अत्याचार करणारा नराधम गजाआड - सीसीटीव्ही फुटेज सातारा गुन्हा

पोलिसांनी तब्बल १३४ ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज ( CCTV footage of 134 places ) तपासले होते. त्यापैकी एका ठिकाणच्या सीसीटीव्हीत संशयित कैद झाला होता. याबाबतचे फुटेजही समाज माध्यमावर ( CCTV footage in social media ) प्रसारित केले होते. गुरुवारी (२४ मार्च रोजी) एका व्यक्तीने समाज माध्यमावरील सीसीटीव्ही फुटेज पाहून संबंधिताला ओळखत असल्याचे सांगितले.

सातारा गुन्हे न्यूज
सातारा गुन्हे न्यूज
author img

By

Published : Mar 25, 2022, 10:40 PM IST

Updated : Mar 25, 2022, 10:58 PM IST

सातारा - पाच वर्षांच्या बालिकेचे अपहरण व लैंगिक अत्याचार करून तिला फेकून पसार झालेल्या नराधमाला गजाआड करण्यात पोलिसांना ( minor girl physical abuse case ) यश आले. गुन्हा केल्यानंतर जिवाच्या भितीने तो घरफोडीच्या गुन्ह्यात पोलिसांना शरण आला होता. बालिकेवरील अत्याचाराचा गुन्हा उघड झाल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन ( Satara police arrest accused ) अटक केली. संकेत स्वरुप गुजर (वय २६, मूळ रा. रामाचा गोट, सातारा. सध्या रा. तामजाईनगर, सातारा) असे त्याचे नाव आहे. त्याच्या नावावर चोरीचे १७ गुन्हे नोंद आहेत.

गेल्या सोमवारी घडलेला प्रकार
पोवईनाका परिसरातून एका व्यक्तीने २१ मार्च रोजी पहाटे पाचच्या सुमारास चार वर्षांच्या मुलीला दुचाकीवरुन पळवून नेले होते. त्यानंतर सातारा तालुक्यातील सोनगावच्या हद्दीत अत्याचार करून चिमुरडीला निर्जनस्थळी सोडून पोबारा केला होता. याबाबत काही ग्रामस्थांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात माहिती दिली होती. त्यानंतर पोलिसांनी अज्ञात आरोपीवर गुन्हा नोंद करून शोध सुरू ( Satara crime news ) केला होता.

अत्याचार करणारा नराधम गजाआड

हेही वाचा-Criminal Monitoring Scheme Aurangabad : आता गुन्हेगारांवर असणार पोलिसांची करडी नजर; १७ पोलीस ठाण्यात 'गुन्हेगारी निरीक्षण योजना'

तब्बल १३४ सीसीटीव्ही धुंडाळले
या कामी पोलिसांनी तब्बल १३४ ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज ( CCTV footage of 134 places ) तपासले होते. त्यापैकी एका ठिकाणच्या सीसीटीव्हीत संशयित कैद झाला होता. याबाबतचे फुटेजही समाज माध्यमावर ( CCTV footage in social media ) प्रसारित केले होते. गुरुवारी (२४ मार्च रोजी) एका व्यक्तीने समाज माध्यमावरील सीसीटीव्ही फुटेज पाहून संबंधिताला ओळखत असल्याचे सांगितले. त्याने पोलिसांना माहिती दिली. त्यामुळे संशयिताचे नाव निष्पन्न झाले.

हेही वाचा-Suitcase Murder Case : 'सुटकेस मर्डर'चा झाला खुलासा.. प्रेयसीच्या हत्येसाठी प्रियकराने बनविला होता 'फुलप्रूफ प्लॅन'..

शोध गावभर अन् सापडला कोठडीत
सोमवारी अत्याचाराचा गुन्हा केल्यानंतर नराधम संकेत गुजर हा स्वत:हून शाहूपुरी पोलीस ठाण्यात हजर झाला होता. बालिका अत्याचाराच्या गुन्ह्यात आपल्याला मारहाण होईल, या जिवाच्या भितीने त्याने एका घरफोडीच्या गुन्ह्याची पोलिसांजवळ कबुली दिली. सध्या तो घरफोडीच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत होता. पोलिसांनी त्याला बालिका अत्याचाराच्या गुन्ह्यात ताब्यात घेतले.

हेही वाचा-Mother Killed Her Own Child : संतापजनक, अनैतिक संबंध वाचवण्यासाठी आईनेच केली मुलाची हत्या..

सुधारगृहातूनही पळाला होता
संकेत गुजरवर आतापर्यंत विविध १७ गुन्हे नोंद आहेत. हे गुन्हे चोरी, जबरी चोरीचे आहेत. यातील अनेक गुन्हे अल्पवयीन असतानाचे आहेत. त्यामुळे त्याला २०१३ ते १६ या वर्षांत नाशिकच्या सुधारगृहातही ठेवण्यात आलेले. तेथूनही तो पळून गेलेला.

Last Updated : Mar 25, 2022, 10:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.