सातारा - कोरोना विषाणूला आळा घालण्यासाठी राज्यासह सर्व जिल्ह्यातही संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नागरिकांनी रस्त्यावर येऊ नये, घरी राहावे असे आवाहन करण्यात आल्यानंतरही नियमांचे उल्लंघन होत असल्याने प्रशासनाने कठोर पाऊल उचलत पेट्रोल, डिझेल विक्रीवरती बंदी घातली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपवरती रांग लागली असली तरी देखील पेट्रोल डिझेल विक्री बंद करण्यात आली आहे.
कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. यावर खबरदारी म्हणून सरकारने राज्यात संचारबंदी लागू केली आहे. यासोबतच, वर्दळीची ठिकाणे वगळती अत्यावश्यक सेवा या सुरू राहणार आहेत. तर, जिल्ह्यामध्ये सर्व ठिकाणी पेट्रोल, डिझेल विक्रीवरती बंदी घातली आहे. आपत्कालीन सेवा आरोग्य विभाग, व शासकीय कर्मचारी यांना फक्त पेट्रोल, डिझेलचा विक्री सुरू आहे.
हेही वाचा - साताऱ्यात कोरोनाचा दुसरा रुग्ण आढळला; शासकीय रुग्णालयात दाखल
अत्यावश्यक सेवेत जे कर्मचारी तसेच अधिकारी काम करत आहेत त्यांनाच फक्त पेट्रोल डिझेल विक्री सुरू आहे. यामुळे काही प्रमाणात नागरिक रस्त्यावर आले नाहीत. तर, काही ठिकाणी पोलिसांनी स्वतः पेट्रोल पंपवरती जाऊन पेट्रोल पंपवरची गर्दी हटवली आहे.
हेही वाचा - कोरोना अपडेट : साताऱ्यातील 'ती' महिला कोरोना बाधित