ETV Bharat / state

जनतेने मनरेगा योजनेच्या माध्यमातून गावांचा कायापालट घडवून आणावा - सत्यजितसिंह पाटणकर - सातारा कोरोना

ग्रामीण विभागातील जनतेचा आणि गावांचा कायापालट करण्याची ताकद मनरेगा योजनेत आहे. जनतेने मनरेगा योजनेतील कामे हाती घेऊन गावांचा कायापालट घडवून आणावा, असे आवाहन पाटण विधानसभा मतदारसंघाचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी केले.

Satyajit Singh Patankar
सत्यजितसिंह पाटणकर
author img

By

Published : May 17, 2020, 12:54 PM IST

सातारा - कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा विपरित परिणाम सर्वच क्षेत्रावर झाला आहे. मुंंबई, पुणे यासारख्या शहरावर झालेल्या परिणामांचा मोठा फटका ग्रामीण विभागालाही बसला आहे. यानिमित्ताने तालुक्यातील ग्रामीण भागातील लोकांनी आपत्ती हीच संधी समजून मिळालेल्या संधीचा उपयोग गावाच्या विकासासाठी करावा. ग्रामीण विभागातील जनतेचा आणि गावांचा कायापालट करण्याची ताकद मनरेगा योजनेत आहे. जनतेने मनरेगा योजनेतील कामे हाती घेऊन गावांचा कायापालट घडवून आणावा, असे आवाहन पाटण विधानसभा मतदारसंघाचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी केले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील पाटण अर्बन बँकेच्या सभागृहात पंचायत समिती तसेच नगरपंचायतीच्यावतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांंची माहिती घेतल्यानंतर ते बोलत होते. यावेळी सभापती राजाभाऊ शेलार,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजाभाऊ काळे, नगराध्यक्ष संजय चव्हाण, उपनगराध्यक्ष सचिन कुंभार, मुख्याधिकारी अभिषेक परदेशी यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी सत्यजितसिंह पाटणकर यांनी सांगीतले की,कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत उद्योग, व्यवसायासह सर्वच क्षेत्रातील कामे ठप्प झाली आहेत. मात्र टाळेबंदीमुळे आता पुन्हा लोकांची पावले रोजगाराच्या शोधासाठी ग्रामीण भागाकडे वळत आहेत. राज्यभरात आता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, मनरेगा मजूरांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. पंचायत समितीने आता ग्रामपंचायत निहाय कामांचे नियोजन करुन स्थानिक जनतेला दिलासा देण्यासाठी पावले उचलली आहेत. कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत ग्रामीण भागाचा कायापालट करण्याची क्षमता असलेल्या या योजनेतील समाविष्ट विविध कामे हाती घेऊन कामे सुरू करण्यासाठी गावातील आजी-माजी लोकप्रतिनिधींनी यामध्ये सहभाग घेवून गावातील लोकांना प्रोत्साहन द्यावे व ही कामे हाती घेत असताना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.

यावेळी सभापती राजाभाऊ शेलार यांनी सांगीतले की,' सभापती आपल्या दारी ' या उपक्रमाद्वारे जनतेचा विकासात्मक कार्यातील सहभाग वाढला आहे. घर तेथे शौचालय, शोषखड्डे, गटर मुक्त गाव, बंदिस्त गटर, डासमुक्ती अशा जनतेच्या आरोग्याशी संबंधित कामासाठी लोकसहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून यातून स्थानिक जनतेसाठी रोजगार निर्मितीही होत आहे. अकुशल रोजगाराच्या पुर्ततेबरोबरच दीर्घकालीन कामांचे नियोजन करण्यात येत आहे. त्यातून सामाजिक पायाभूत सोयी उपलब्ध करून देऊन ग्रामीण जनतेचे राहणीमान उंचावण्यासाठी जलसंवर्धन व जलसंधारण, वनीकरण व वृक्षलागवड,जमीन विकासाची कामे पूरनियंत्रण, पुरसंरक्षक कामासह मनरेगा अंतर्गत कामे हाती घेण्यात येत आहेत.ग्रामपंचायत स्तरावर याचे नियोजन करण्यात येत असून याकामी ग्रामसेवकांनी गावनिहाय कामे सुरू करण्यासाठी लोकसहभाग वाढवावा.या योजनेतून झालेल्या कामांचे अनुदान तातडीने देण्यात येईल असे सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.