ETV Bharat / state

आम्हाला फक्त गुन्हेगार म्हणून का बघता? दरोडाप्रकरणी तपास करणाऱ्या पोलिसांना पारधी समाजाचा सवाल - दहिवडी

डूज (खटाव) येथील मांडवे येथे रात्री दोनच्या सुमारास दरोडा पडला होता. याप्रकरणी जिल्ह्यात अनेक ठिकाणी पोलीस पथके तपासासाठी फिरत होते. दरम्यान, दहिवडी पोलीस ठाण्याची गाडी दहिवडी येथील विकास नगरमध्ये तपासासाठी गेली असता त्याठिकाणी पारधी समाजाने ३ ते ४ तास गाडी अडवून ठेवली. आम्हाला फक्त गुन्हेगार म्हणून का बघता? असा सवाल यावेळी पारधी समाजाने केला.

दरोडा प्रकरणी तपासाला आलेली पोलीस गाडी पारधी समाजाने अडवली
author img

By

Published : Jun 2, 2019, 2:51 PM IST

सातारा - वडूज (खटाव) येथील मांडवे येथे रात्री दोनच्या सुमारास दरोडा पडला होता. याप्रकरणी जिल्ह्यात अनेक ठिकाणी पोलीस पथके तपासासाठी फिरत होते. दरम्यान, दहिवडी पोलीस ठाण्याची गाडी दहिवडी येथील विकास नगरमध्ये तपासासाठी गेली असता त्याठिकाणी पारधी समाजाने ३ ते ४ तास गाडी अडवून ठेवली. आम्हाला फक्त गुन्हेगार म्हणून का बघता? असा सवाल यावेळी पारधी समाजाने केला.

दरोडा प्रकरणी तपासाला आलेली पोलीस गाडी पारधी समाजाने अडवली

याबद्दल अधिक माहिती अशी, की रात्री दोनच्या सुमारास मांडवे येथील गावात दरोडा पडला होता. त्याच्या तपासासाठी उपविभागीय पोलीस प्रशासनाकडून तपास पथके रवाना करण्यात आली होती. त्यानुसार तपास चालू होता. मात्र, दहिवडी येथे या प्रकरणाला वेगळेच वळण लागले.

दोन दिवसापूर्वी याठिकाणी राहणाऱ्या पारधी समाजातील एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली होती. त्याचा तपास न करता आपण दरोड्यांचा तपासासाठी येथे येऊन आमच्या मुलांना मारहाण का केली? आमच्या मुलीचा तपास का अशा पध्दतीने करत नाही? आमच्या समाजाला फक्त गुन्हेगारी म्हणून का बघता? असा संतप्त सवाल करत पारधी समाजाने पोलिसांची गाडी सुमारे ३ ते ४ तास अढवून ठेवली होती. यामुळे या भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले होता.

Intro:

Body:satara

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.