सातारा - संजय राठोड यांनी माणसे जमा केली नाहीत. राठोड हे केवळ त्यांच्या धार्मिक स्थळाच्या दर्शनासाठी पोहरादेवीला गेले होते. त्यामुळे, तिथे गर्दी झाली, असे स्पष्टीकरण गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी कराड येथे पत्रकार परिषदेत दिले.
हेही वाचा - गांजा शेती करणार्या परदेशी आरोपींचा कारागृहात विवस्त्र होत धुमाकूळ
पोहरादेवी येथे झालेल्या गर्दीच्या अनुषंगाने आम्ही सर्व चौकशी केली. त्या ठिकाणी कोरोना नियमांचे उल्लंघन झाले आहे, म्हणून स्थानिक प्रशासनाला कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार प्रशासनाला तिथे ज्या बाबी आढळल्या त्याप्रमाणे कारवाई केली आहे. तसेच, गुन्हेही दाखल झालेली आहेत, असेही गृहराज्यमंत्री देसाई म्हणाले.
पोहरादेवीत संजय राठोड यांनी केलेल्या शक्ती प्रदर्शनामुळे शरद पवार हे नाराज झाले, असे विचारले असता, तुम्हाला कोणी सांगितले? असा प्रतिप्रश्न देसाई यांनी पत्रकारांना केला. वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या अनुषंगाने प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन उद्यापासून कोरोना प्रतिबंधात्मक नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेशही दिले असल्याचे देसाई म्हणाले.
हेही वाचा - गांजा शेती करणार्या परदेशी आरोपींचा कारागृहात विवस्त्र होत धुमाकूळ