पाटण तालुक्यातील Patan Taluka Burglary latest news तारळे परिसरात चोरट्यांनी पीपीई कीट घालून Burglars wearing PPE Kits Satara सात बंद घरे फोडली. एकाच रात्रीत सात ठिकाणी घरफोडीचा प्रयत्न Burglary attempt Patan झाल्याने तारळे परिसरातील नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. Burglary by wearing PPE Patan पीपीई कीट घातलेले चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले असून सात ठिकाणी घरफोडी करूनही चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही.
मध्यरात्रीच्या सुमारास घरफोडीचा प्रयत्न तारळे परिसरातील वजरोशी गावात मध्यरात्री सयाजी डफ़ळे व संपत साळुंखे यांची बंद घरे चोरट्यांनी फोडली. त्यानंतर पांढरवाडी गावातील सुरेश जयसिंग शिंदे, तारळे गावातील बाबा जाधव यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. हनुमान पेठेतील महेश विश्वनाथ म्हावशे यांच्या बंद घर फोडले. यावेळी चोरट्यांनी आजूबाजूच्या घरांना बाहेरून कड्या लावल्या. ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोरील गोविंद लाहोटी यांचे दुकान तसेच सासपडे येथील शकुंतला पंढरीनाथ यादव व भिमराव महादेव यादव यांचीही घरे चोरट्यांनी फोडली. व्यावसायिकांनी लावलेल्या सीसीटीव्हीत चोरटे कैद झाले. त्यांनी पीपीई कीटसारखा पेहराव केल्याचे दिसत आहे.
महिलेला दाखवला कुर्हाडीचा धाक ग्रामपंचायत कार्यालयासमोरील दुकान फोडताना एक महिला जागी झाली. ती घराच्या गॅलरीत येऊन पाहिले असताना चोरटे दुकान फोडत होते. तिने चोर..चोर.. म्हणत मुलाला हाका मारायला सुरुवात केली. त्यावेळी दुकानाबाहेर उभ्या असणार्या एका चोरट्याने त्यांना कुर्हाड दाखवली. घरातील लोक बाहेर येईपर्यंत चोरट्यांनी धूम ठोकली. अंगात पांढरा कोट, तोंडावर मास्क आणि डोक्यावर टोपी अशा पीपीई कीटच्या पेहरावातील चोरटे हत्यारबंद होते.
हेही वाचा Body of 15 year old girl found in bag नायगावमध्ये बॅगेत सापडलेल्या तरुणीच्या मृतदेहाचे कोडे उलगडले