ETV Bharat / state

पाटण विधानसभा मतदारसंघावर पुन्हा शंभू'राज' की सत्य'जित'? - विधानसभा पाटण

सातारा पाटण विधानसभा मतदारसंघात सोमवारी मोठ्या उत्साहात मतदान प्रक्रिया पार पडली असून, आज होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. त्यामुळे पाटण मतदारसंघात पुन्हा शंभू'राज' येणार, की परिवर्तन होवून सत्य'जित' येणार याबाबत मतदार आणि कार्यकर्त्यांमधील उत्सुकता वाढली असल्याचे दिसून येत आहे.

Maharashtra Assembly Elections 2019
author img

By

Published : Oct 24, 2019, 4:18 AM IST

सातारा - पाटण विधानसभा मतदारसंघात नेहमीच देसाई-पाटणकर या दोन पारंपारिक प्रतिस्पर्धी गटात 'काटे की टक्कर' पहायला मिळत असते. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत इथे एकूण 1 लाख 77 हजार 50 इतके मतदान झाले होते. यापैकी, शिवसेनेचे उमेदवार शंभूराज देसाई यांना एकूण 1 लाख 4 हजार 419 मते मिळाली होती. 18 हजार 824 एवढे मताधिक्य घेऊन आ. देसाईंनी पाटण विधानसभा मतदारसंघावर आपला झेंडा फडकविला होता. त्यांचे प्रतिस्पर्धी आणि प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार, युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर यांना एकूण 85 हजार 595 मते मिळाली होती. त्यामुळे, जरी पराभव झाला असला, तरी 'हम भी किसी से कम नही' हे दाखवून दिले होते.

Maharashtra Assembly Elections 2019
पाटण विधानसभा मतदारसंघावर पुन्हा शंभू'राज' की सत्य'जित'?

2019च्या विधानसभा निवडणुकीत, पाटण विधानसभा मतदारसंघात 1800 कोटी रुपयांची विकासकामे झाली असल्याचा दावा करत देसाई हे निवडणुकीला सामोरे गेले. तर सत्यजितसिंह पाटणकर यांनी पाटण विधानसभा मतदारसंघात आजपर्यंत उभारलेले छोटे-मोठे प्रकल्प, त्या माध्यमातून तालुक्यात निर्माण झालेला रोजगार, युवकांच्या हाताला मिळालेले काम आणि तालुक्यात झालेली विकासकामे अशा मुद्यांवर लक्ष केंद्रित केले होते.

यावर्षी पाटण विधानसभा मतदारसंघात एकूण 9 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. मात्र, शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार आ. शंभूराज देसाई आणि काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार सत्यजितसिंह पाटणकर या दोघांमध्येच मोठी लढत होणार आहे. पाटण तालुक्यात एकूण 2 लाख 99 हजार 929 इतके मतदार असून, 2 लाख 3 हजार 129 एवढे मतदान झाले आहे. यातील 1 लाख 51 हजार 333 पुरूष मतदारांपैकी 1 लाख 4 हजार 316 पुरूषांनी मतदान केले. तर 1 लाख 48 हजार 595 महिला मतदारांपैकी 98 हजार 813 इतक्या महिलांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. येथे एकूण 67.73 टक्के मतदान झाले. 2014च्या विधानसभा निवडणुकांवेळी इथे 72 टक्के मतदान झाले होते. त्यामुळे 2014च्या तुलनेत यंदा मतदानाची टक्केवारी चार टक्क्याने घसरलेली पहावयास मिळत आहे.

हेही वाचा : सातारा लोकसभा मतदारसंघातील रयतेचा कौल कोणाला? राजे राखणार का गड

Intro:सातारा पाटण विधानसभा मतदारसंघात सोमवारी मोठ्या उत्साहात मतदान प्रक्रिया पार पडली असून आज होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. त्यामुळे 2019 चा आमदार म्हणून पाटण विधानसभा मतदारसंघावर कोणाची मदार राहणार? पाटण विधान मतदारसंघात पुन्हा शंभू"राज' येणार, की परिवर्तन होवून सत्य"जित' येणार याबाबतची मतदार आणि कार्यकर्त्यांमधील उत्सूकता वाढली असल्याचे पहावयास मिळत आहे. एकंदरीत या निवडणुकीत कडवी झुंज होणार हे मात्र नक्की.
Body:पाटण विधानसभा मतदारसंघात नेहमीच देसाई-पाटणकर या दोन पारंपारिक प्रतिस्पर्धी गटात काटे की टक्कर पहायला मिळत असते. 2014 च्या निवडणुकीत 88 हजार 729 पुरूष मतदार, 88 हजार 321 महिला मतदार असे एकूण 1 लाख 77 हजार 50 इतके मतदान झाले होते. यापैकी शिवसेनेचे उमेदवार शंभूराज देसाई यांना एकूण 1 लाख 4 हजार 419 मते मिळाली होती. तब्बल 18 हजार 824 मताधिक्य घेवून आ. देसाईंनी पाटण विधानसभा मतदारसंघावर भगवा फडकविला होता. तर त्यांचे प्रतिस्पर्धी आणि प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी एकूण 85 हजार 595 इतके मताधिक्य मिळवत जरी पराभव झाला असला तरी "हम भी किसी से कम नही' हे दाखवून दिले होते.
2019 च्या निवडणुकीत आ. शंभूराज देसाई यांनी पाटण विधानसभा मतदारसंघात 1800 कोटी रुपयांची विकासकामे झाली असल्याचा दावा करत ते निवडणुकीला सामोरे गेले. तर सत्यजितसिंह पाटणकर यांनी पाटण विधानसभा मतदारसंघात आजपर्यंत उभारलेले छोटे-मोठे प्रकल्प, त्या माध्यमातून तालुक्यात निर्माण झालेला रोजगार, युवकांच्या हाताला मिळालेले काम, झालेली विकासकामे हे मुद्दे घेवून ते मतदारांसमोर गेले होते. या दोन्ही लोकप्रतिनिधींनी आपापल्या परीने पाटण विधानसभा मतदारसंघातील तळागाळातील गावेच्या गावे पिंजून काढत, वाड्यावस्त्यांवरील मतदारांपर्यंत पोहोचून केलेली कामे प्रचाराच्या माध्यमातून लोकांना सांगितली. यावेळी दोघांकडून एकमेकांविरोधात आरोप-प्रत्यारोपही झालेत. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी अगदी झपाटून आपल्या नेत्यांचा प्रचार केला असल्याचे दिसून आले.
यावर्षी पाटण विधानसभा मतदारसंघात एकूण 9 उमेदवार रिंगणात उतरले होते. मात्र पक्षीय शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार आ. शंभूराज देसाई आणि राष्ट्रवादी-राष्ट्रीय कॉंग्रेस व मित्रपक्ष महाआघाडीचे उमेदवार सत्यजितसिंह पाटणकर या दोघांमध्येच खऱ्याअर्थाने सामना रंगला. पाटण तालुक्यात एकूण 2 लाख 99 हजार 929 इतके मतदान असून 2 लाख 3 हजार 129 एवढे मतदान झाले. यातील 1 लाख 51 हजार 333 पुरूष मतदारांपैकी 1 लाख 4 हजार 316 पुरूषांनी मतदान केले. तर 1 लाख 48 हजार 595 महिला मतदारांपैकी 98 हजार 813 इतक्या महिलांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. येथे एकूण 67.73 टक्के मतदान झाले. 2014 रोजी 72 टक्के मतदान झाले होते. 2019 रोजी म्हणजेच यावर्षी या मतदारसंघात 67.73 टक्के मतदान झाले असून 2014 च्या तुलनेत मतदानाची टक्केवारी चार टक्क्याने घसरलेली पहावयास मिळत आहे.
या निवडणुकीची मतमोजणी सातारा येथे होत असल्याने या मतमोजणीकडे पाटण विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. अनेकांनी एकमेकांमध्ये पैजा लावल्या असून यावरून निकालाची उत्कंठा वाढली असल्याचे पहावयास मिळत आहे. शिवसेनेकडून आ. शंभूराज देसाई हेच मोठ्या मताधिक्याने निवडून येतील तर घासून का होईना राष्ट्रवादीकडून सत्यजितसिंह पाटणकर हेच निवडून येतील असे दावे, प्रतिदावे सध्या पाटण विधानसभा मतदारसंघातील देसाई-पाटणकर या दोन्ही गटांकडून करण्यात येत आहेत. त्यामुळे पाटण विधानसभा मतदारसंघावर पुन्हा शंभू"राज' येणार, की परिवर्तन होवून सत्य"जित' येणार? हे आज रोजी 24 तारखेला होणाऱ्या मतमोजणीनंतरच समजेल.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.