ETV Bharat / state

Afzal Khan Tomb Security : 'अफजलखानच्या कबर परिसराची पाहणी हा सरावाचा भाग'

सातारा पोलिसांनी अफजखानच्या कबरीबाहेर सुरक्षा ( Afzal Khan Tomb Security ) वाढवली आहे. याप्रकरणी आता सातारा पोलीस अधिक्षक अजय बन्सल ( Satara SP Ajay Bansal ) यांनी 'ईटीव्ही भारत'ला आपली प्रतिक्रिया दिली आहे.

author img

By

Published : May 25, 2022, 9:59 PM IST

Afzal Khan Tomb Security
Afzal Khan Tomb Security

सातारा - मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुण्यातील सभेत आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांना मारण्यासाठी आलेल्या अफजलखानाला महाराजांनी मारले. मात्र, त्याची 4×6 फुटांची कबर आहे, आज तिथे मशीद बांधली आहे, असे वक्तव्य केले होते. त्यातच आता सातारा पोलिसांनी अफजखानच्या कबरीबाहेर सुरक्षा वाढवली ( Afzal Khan Tomb Security ) आहे. याप्रकरणी आता सातारा पोलीस अधिक्षक अजय बन्सल ( Satara SP Ajay Bansal ) यांनी 'ईटीव्ही भारत'ला आपली प्रतिक्रिया दिली आहे.

अजय बन्सल म्हणाले की, 'प्रतापगडावरील अफजल खानाची कबर २००५ पासून प्रतिबंधित क्षेत्र आहे. त्यामध्ये १७-१८ वर्षांत कोणताही बदल नाही. सीआरपीएफच्या जवानांनी कबर परिसराची केलेली पाहणी हा नेहमीचा सरावाचा भाग आहे,' असे स्पष्टीकरण बन्सल यांनी दिले आहे.

'तिथे कोणालाही प्रवेश दिला जात नाही. केवळ कबरीच्या देखभालीसाठी एक मुजावर तिथे जाऊ शकतो. अन्य लोकांच्या प्रवेशाला मज्जाव आहे. कबरीला पोलिसांचा 24 तास बंदोबस्त असतो. सीआरपीएफच्या एका तुकडीने सातारा जिल्ह्यातील कराड, पाटण, महाबळेश्वरला भेट दिली. या भेटीतच त्यांनी प्रतापगडावरील अफजल खान कबर परिसराची पाहणी केली. ही पाहणी नित्याच्या सरावाचा भाग असतो. अशी पाहणी दोन वर्षांतून एकदा होतच असते,' असेही अजय बन्सल यांनी सांगितले आहे.

राज ठाकरे काय म्हणाले होते? - ओवेसीने औरंगजेबाच्या कबरीवर डोकं ठेवल्याने महाराष्ट्र पेटून उठेल, असे वाटले होते. मात्र, तसे काही झाले नाही. महाराजांना मारण्यासाठी आलेल्या अफजलखानाची कबर आता मशिद झाली आहे. त्यासाठी देणग्या येत आहेत. ह्या देणग्या देणाऱ्या अवलादी कोण आहेत. या घटना घडत असताना आपण थंड पडलो आहोत, असे राज ठाकरेंनी म्हटले होते.

हेही वाचा - Yasin Malik : दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी यासिन मलिकला जन्मठेप; वाचा, काय आहे प्रकरण?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.