ETV Bharat / state

Minor Girl Murder Satara : प्रेम प्रकरणातून अल्पवयीन मुलीची आई-वडीलांकडून हत्या; डोंगरात पुरला मृतदेह

author img

By

Published : May 1, 2022, 9:29 PM IST

प्रेम प्रकरणातून समाजात आपली बदनामी होईल, या भितीने आई-वडिलांनी गळा दाबून मुलीचा खून केला. पवारवाडी (ता. कराड) हद्दीतील डोंगरावर पुरलेला मुलीचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. या घटनेमुळे कराड तालुक्यात खळबळ उडाली असून मुलीच्या प्रेमप्रकरणामुळे समाजात बदनामी होईल, या कारणाने आई-वडीलांनी मुलीचा खून केल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे.

Minor Girl Murder Satara
Minor Girl Murder Satara

कराड (सातारा) - कराड तालुक्यातील येणके गावातून बेपत्ता झालेल्या मुलीचा आई-वडीलांनीच खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गळा दाबून खून केल्यानंतर पवारवाडी (ता. कराड) हद्दीतील डोंगरावर पुरलेला मुलीचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. या घटनेमुळे कराड तालुक्यात खळबळ उडाली असून मुलीच्या प्रेम प्रकरणामुळे समाजात बदनामी होईल, या कारणाने आई-वडीलांनी मुलीचा खून केल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे. याप्रकरणी संजय नारायण गरूड आणि पत्नी रूपाली संजय गरूड यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मुलगी बेपत्ता झाल्याची वडीलांनी दिली होती तक्रार : येणके (ता. कराड) येथील संजय गरूड यांनी आपली अल्पवयीन मुलगी शाळेत पुस्तके जमा करण्यासाठी गेली असताना तिला अज्ञाताने फूस लावून पळवून नेले असल्याची तक्रार दि. 17 एप्रिल रोजी कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली होती. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञाताविरोधात अपहरणाचा गुन्हा नोंद केला होता. गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास सुरू असताना पोलिसांना माहिती मिळाली की, बेपत्ता मुलीचा प्रेमप्रकरणातून खून करण्यात आला आहे. तक्रारदाराच्या चुलत भावाबरोबर मुलीचे प्रेमसंबंध होते. सज्ञान होताच ती त्याच्याबरोबर लग्न करणार होती. ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तपासाची दिशा बदलली आणि बेपत्ता मुलीच्या आई-वडीलांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.

पोलीस तपासात वडीलांनी दिली खुनाची कबुली : संशयित म्हणून तक्रारदार संजय गरूड यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान, त्यांनी मुलीच्या खुनाची कबुली दिली. चुलत भावाबरोबर मुलीचे प्रेमसंबंध होते. सज्ञान झाल्यावर मुलगी त्याच्याशी लग्न करणार होती. असे झाल्यास समाजात आपली बदनामी होईल, या भीतीने आई-वडीलांनी तीला पवारवाडी (ता. कराड) येथील वडाचे मळा नावाच्या शिवारात नेवून तीचा गळा आवळून खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी पवारवाडीच्या डोंगरावर खड्डा काढून मुलीचा मृतदेह पुरल्याची माहिती चौकशीत पुढे आली.

पुरलेला मृतदेह पोलिसांनी घेतला ताब्यात : बेपत्ता मुलीचा आई-वडीलांनीच खून केल्याचा प्रकार तपास उघड झाल्यानंतर पोलिसांनी पवारवाडी येथील डोंगरावर जाऊन मुलीचा पुरलेला मृतदेह बाहेर काढला. पोलिसांनी घटनास्थळीच मृतदेहाचा पंचनामा केला. अधिक तपास पोलीस करत आहे.

हेही वाचा - आंध्र प्रदेश : रेल्वे स्टेशनवर २५ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.